'गावासाठी काय केलं?' असा प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला काँग्रेस आमदाराची बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 12:49 IST2021-10-20T12:49:41+5:302021-10-20T12:49:49+5:30

काँग्रेस आमदारासह सुरक्षा रक्षक आणि इतर कार्यकर्त्यांनीही मारहाण केली.

Congress MLA Joginder Pal assaulting a man who Questions him over work done in his constituency | 'गावासाठी काय केलं?' असा प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला काँग्रेस आमदाराची बेदम मारहाण

'गावासाठी काय केलं?' असा प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला काँग्रेस आमदाराची बेदम मारहाण

पठाणकोट: पठाणकोटच्या (Pathankot) भोआ क्षेत्राचे आमदार जोगिंदर पाल(MLA Joginder Pal) यांनी पंजाबच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. गावासाठी काय केलं, असा प्रश्न विचारणाऱ्या एका तरुणाला आमदारांनी सगळ्यांसमोर बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात जोगिंदर पाल पोलिस आणि आपल्या कार्यकर्त्यांसह तरुणाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. एका वृत्त वाहिनीने या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ नवरात्रीदरम्यानचा आहे. आमदार जोगिंदर पाल हे गावातील कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी ते बोलत असताना एका व्यक्तीने त्यांना विचारले की, तुम्ही गावासाठी काय केले? यामुळे आमदार भडकले आणि त्यांनी व्यक्तीला थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यासह पोलिस आणि काही कार्यकर्त्यांनीही त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली.

यादरम्यान इतर लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. कुणीही आमदार किंवा इतर लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केला नाही. यावेळी गर्दीतील एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडिओ शूट करुन व्हायरल केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदारावर टीकेची झोड उठली आहे. आता पक्ष यावर काय कारवाई करणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Read in English

Web Title: Congress MLA Joginder Pal assaulting a man who Questions him over work done in his constituency