काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 07:02 IST2025-08-24T07:01:46+5:302025-08-24T07:02:11+5:30
Congress MLA Arrest News: ऑनलाइन सट्टा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कर्नाटकातील काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र पप्पी यांना गंगटोक येथे अटक केली आहे.

काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
नवी दिल्ली - ऑनलाइन सट्टा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कर्नाटकातीलकाँग्रेसआमदार के. सी. वीरेंद्र पप्पी यांना गंगटोक येथे अटक केली आहे. या प्रकरणी ईडीने शुक्रवारी अनेक ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत १२ कोटी रुपयांची रोकड, ६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, जवळपास १० किलो चांदी आणि ४ आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. ईडीने आमदाराच्या १७ बँक खात्यांवरही टाच आणली असून २ लॉकर, विविध क्रेडिट/डेबिट कार्ड व पंचतारांकीत हॉटेलचे सभासदत्व कार्ड गोठवले आहे. याशिवाय, आमदाराच्या भावाच्या परिसरातही छापे टाकून कागदपत्रे जप्त केली आहेत. पुढील चौकशीसाठी पप्पी यांना बंगळुरू येथे आणले जाणार आहे. काँग्रेसने अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.