शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 14:07 IST

केंद्रातील मोदी सरकारसह इतर राज्यांतील भाजप सरकारेही धार्मिक ध्रुवीकरण आणि सांप्रदायिक भावना ज्वलंत ठेवण्याची संधी शोधत असतात, असे खरगे यांनी म्हटले आहे. 

काँग्रेसाध्यक्षमल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी (24 सप्टेंबर 2025) पाटण्यातील सदाकत आश्रम येथे आयोजित सीडब्ल्यूसीच्या बैठकीत सत्ताधारी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही थेट निशाणा साधला. केंद्रातील मोदी सरकारसह इतर राज्यांतील भाजप सरकारेही धार्मिक ध्रुवीकरण आणि सांप्रदायिक भावना ज्वलंत ठेवण्याची संधी शोधत असतात, असे खरगे यांनी म्हटले आहे. 

‘योगी स्वत:ला पंतप्रधानांचा वारसदार समजतात’ -उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्ला चढवताना योगी काँग्रेसाध्यक्ष खरगे म्हणाले, "सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री स्वत:ला पंतप्रधानांचा वारसदार समजतात. त्यांनी यापूर्वी आरक्षणाविरोधात लेख लिहिला होता. आता त्यांनी जातीय रॅलींवर बंदी घातली आहे. यावेळी पंतप्रधानांकडे आपला रोख वळवत खरगे म्हणाले, "एकीकडे आपण सर्वजण जातीय जनगणनेची मागणी करत आहोत, तर दुसरीकडे जे लोक अन्याय आणि अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरतात, त्यांना तुमचे मुख्यमंत्री तुरुंगात टाकण्याची भाषा बोलतात. हे योग्य आहे का? हे पंतप्रधानांनी देशाला सांगावे.

नीतीश सरकारवर हल्लाबोल -काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणाले, भाजपने जानेवारी 2024 मध्ये नीतीश कुमार यांना पुन्हा पाठिंबा देऊन बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन केले. नीतीश सरकारने विकासाचे आश्वासन दिले. पण, बिहारची अर्थव्यवस्था मागे पडत आहे. डबल इंजन सरकारचा दावा पोकळ ठरला आहे. केंद्राकडून बिहारला कोणतेही विशेष पॅकेज मिळालेले नाही.

‘नीतीश आता भाजपसाठी 'ओझं'’खरगे पुढे म्हणाले, सीडब्ल्यूसीची ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. आपण अशा वेळी एकत्र आलो आहोत, जेव्हा देश आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर आव्हानात्मक आणि चिंताजनक परिस्थितीतून जात आहे. एनडीए आघाडीतील अंतर्गत मतभेद आता समोर येत आहेत. भाजपने नीतीश कुमार यांना मानसिकदृष्ट्या सेवानिवृत्त केले आहे. आता भाजप ते 'ओझं' वाटू लागले आहेत. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेyogi adityanathयोगी आदित्यनाथNitish Kumarनितीश कुमारcongressकाँग्रेसBJPभाजपा