शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

माझ्या भाषणांमुळे काँग्रेसची मतं कमी होतात- दिग्विजय सिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 8:34 AM

काँग्रेसचे एकेकाळचे चाणक्य पक्षाकडून दुर्लक्षित

नवी दिल्ली: माझ्या भाषणांमुळे काँग्रेसची मतं कमी होतात, असं काँग्रसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माझ्या भाषणांमुळे काँग्रेसचं नुकसान होतं. त्यामुळेच मी रॅली आणि जनसभांना संबोधित करत नाही, असं सिंह म्हणाले. कधीकाळी काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे दिग्विजय सिंह दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जीतू पटवारी यांच्या घरी गेले होते. तिथून निघताच अनेक कार्यकर्ते सिंह यांच्यासमोर गोळा झाले. या कार्यकर्त्यांशी दिग्विजय यांनी संवाद साधला. 'काम केलं नाहीत, तर फक्त स्वप्न बघत राहाल. असं केलंत, तर सरकार स्थापन करु शकणार नाही. तुमच्या शत्रूला तिकीट मिळालं, तरी त्याला निवडून आणा,' असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं. यानंतर दिग्विजय यांच्या मनातील खदखद बाहेर पडली. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसमध्ये दिग्विजय यांना साईडलाईन करण्यात आलं आहे. याबद्दल मनात असलेली नाराजी त्यांनी बोलून दाखवली. 'माझं फक्त एकच आहे. कोणताही प्रचार नाही. कोणतंही भाषण नाही. माझ्या भाषणामुळे तर काँग्रेसची मतं कमी होतात. त्यामुळे मी कुठे जातच नाही,' असं सिंह म्हणाले. राहुल गांधींनी तरुण नेत्यांना संधी दिल्यानं अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजीची भावना आहे. दिग्विजय सिंहदेखील याला अपवाद नाहीत. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी भोपाळला आले होते. त्यावेळी त्यांनी रोड शो केला होता. यावेळी लावण्यात आलेल्या बॅनरवर दिग्विजय सिंह यांचा फोटो नव्हता. त्यामुळे पक्षातील गटबाजी दिसून आली होती. 

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी