शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

लोकसभेच्या उमेदवार निश्चितीला बसले; काँग्रेस नेत्यांनी एकमेकांना चोपले 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 1:49 PM

हरिद्वार लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसने बैठक बोलावली होती.

रुडकी : जिल्हा नियोजन बैठकीमध्ये झालेल्या भाजपाच्या नेत्यांमध्ये बूट-चप्पलाच्या देवाणघेवाणीवरून देशभरात चर्चा होत असताना आता उत्तराखंड काँग्रेस नेत्यांचे कारनामेही समोर आले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरविण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत नेत्यांनी एकमेकांनाच चोपल्याचा प्रकार घडला आहे. माजी मुख्यमंत्री 'हरीष रावत मुर्दाबाद' म्हटल्याने ठिणगी पेटल्याचे समजते. 

हरिद्वार लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसने बैठक बोलावली होती. यासाठी माजी खासदार आणि निरिक्षक महिंद्र पाल सिंह यांना पाठविण्यात आले होते. या दरम्यान माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि माजी जिल्हाध्यक्ष डॉ. संजय पालीवाल यांच्या समर्थकांमध्ये तिकिट कोणाला द्यायचे यावरून वाद सुरु झाला. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तेवढ्यात पालिवाल यांच्या एका कार्यकर्त्याने 'हरीष रावत मुर्दाबाद' अशी आरोळी ठोकली आणि दोन्ही गट एकमेकांना भिडले. जवळपास अर्धातास हा गोंधळ सुरु होता. यानंतर वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करत वाद शांत केला. 

इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु होत्या. प्रत्येकाला आतमध्ये बोलवले जात होते. खोलीच्या एका बाजुला रावत समर्थक तर दुसऱ्या बाजुला पालीवाल समर्थक उभे होते. ज्याच्या गटाच्या नेत्याला बोलावले जायचे त्याचा गट जोरदार घोषणाबाजी करायचा. हाणामारीवेळी माजी महापौर यशपाल राणा, डॉ. संजय पालीवाल आणि माजी राज्यमंत्री मनोहरलाल शर्मा यांनी मध्यस्थी केली. काँग्रेसचे निरिक्षक सिंह यांनी केवळ बाचाबाची झाल्याचे सांगत मारामारीचे वृत्त फेटाळले. 

स्थानिक आणि बाहेरचा वादकाँग्रेसमध्ये लोकसभेच्या जागावाटपावेळी मतदारसंघाच्या बाहेरचे आणि स्थानिक कांग्रेसी असा वाद उफाळला आहे. एक गट रावत य़ांच्या उमेदवारीला विरोध करत आहे. या गटाने पालीवाल यांना तिकिट देण्याची मागणी केली आहे. यामुळे दोन्ही गटांमध्ये असंतोष उफाळला आहे.

10 जण इच्छुक या बैठकीवेळी 10 जणांनी लोकसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापैकी 5 जणांनी आधीच दावा केला होता. निरिक्षक महेंद्र पाल सिंह यांनी कोणालाही तिकिट मिळाले तरी गटतट बाजुला ठेवून काँग्रेसला जिंकवण्यासाठी काम करण्याच्या सूचना केल्या आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९