महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी घेतली सोनिया गांधींची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 04:16 IST2019-08-17T04:15:18+5:302019-08-17T04:16:55+5:30

महाराष्ट्रातील पूर परिस्थितीची माहिती शुक्रवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिली.

Congress leaders in Maharashtra meets  Sonia Gandhi | महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी घेतली सोनिया गांधींची भेट

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी घेतली सोनिया गांधींची भेट

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पूर परिस्थितीची माहिती शुक्रवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिली.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे मोठी जीवित हानी, तसेच आर्थिक नुकसान झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत राज्यातील ५१ लोकांना प्राण गमवावा लागला. या नुकसानीची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात आज सोनिया गांधी यांची भेट
घेतली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, नितीन राऊत, आमदार यशोमती ठाकूर व मुजफ्फर हुसैन उपस्थित होते. अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यावेळी उपस्थित होते.

Web Title: Congress leaders in Maharashtra meets  Sonia Gandhi