Congress leaders Chindambaram targets BJP | तिहारमध्ये असलेल्या चिदंबरम यांनी घेतला भाजपचा समाचार, म्हणाले...
तिहारमध्ये असलेल्या चिदंबरम यांनी घेतला भाजपचा समाचार, म्हणाले...

नवी दिल्ली : भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी जीडीपीवर केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्याप्रमाणावर टीका होताना पाहायला मिळत आहे. त्यात काँग्रेसनेही दुबे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मंगळवारी भाजपवर निशाणा साधला. आता देशाच्या अर्थव्यवस्थेला देवच वाचवू शकतो, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

संसदेमध्ये सोमवारी जीडीपीच्या मुद्यावर चर्चा झाली. तर जीडीपी म्हणजे रामायण, बायबल किंवा महाभारत नाही. त्यामुळे जीडीपी हेच सत्य आहे असं मानण्याची गरज नाही. भविष्यात जीडीपीचा फारसा उपयोग होणार नाही, असं धक्कादायक विधान भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलं होत. त्यांनतर त्यांच्यावर सर्वच स्तरावरून टीका होताना पाहायला मिळत होते.

याच मुद्यावरून तिहार तुरूंगात असलेल्या पी. चिंदमबरम यांनी सुद्धा दुबे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. चिंदमबरम यांनी टि्वटमध्ये म्हटले की, जीडीपीच्या आकड्यांना काही अर्थ राहिलेला नाही. वैयक्तिक करात कपात होईल, आयात शूल्कात वाढ केली जाईल. सुधारणेबाबत भाजपचे हे विचार आहेत. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला आता देवच वाचवेल.

 

 

Web Title: Congress leaders Chindambaram targets BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.