गाढवावर फोटो लावून नेत्यानं साजरा केला मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस; आता स्वतःच गाढव चोरीच्या आरोपात अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 15:35 IST2022-02-19T15:34:24+5:302022-02-19T15:35:23+5:30

Venkat Balmoor : पोलिसांनी व्यंकट बालमूर यांना गुरुवारी रात्री हुजुराबाद शहरातून अटक केली. 

Congress leader who protested against KCR using a donkey, arrested for stealing it  | गाढवावर फोटो लावून नेत्यानं साजरा केला मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस; आता स्वतःच गाढव चोरीच्या आरोपात अडकले

गाढवावर फोटो लावून नेत्यानं साजरा केला मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस; आता स्वतःच गाढव चोरीच्या आरोपात अडकले

तेलंगणा : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा वाढदिवस गाढवासमोर साजरा करणारे काँग्रेस नेते आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व्यंकट बालमूर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर गाढव चोरीचा आरोप आहे. पोलिसांनी व्यंकट बालमूर यांना गुरुवारी रात्री हुजुराबाद शहरातून अटक केली. 

तेलंगणा राष्ट्र समितीच्या (TRS) नेत्यांच्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 17 फेब्रुवारीला तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विरोधी पक्ष काँग्रेसकडून अनोखी तयारी करण्यात आली होती. 

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा वाढदिवस राज्यभरात गाढवासमोर केक कापून साजरा करण्याची काँग्रेसची योजना होती. योजनेद्वारे काँग्रेस नेते व्यंकट बालमूर यांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा वाढदिवस गाढवासमोर साजरा केला. गाढवाच्या चेहऱ्यावर मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा फोटो लावून केक कापला. 

यानंतर तेलंगणा राष्ट्र समितीच्या नेत्यांनी यावर आक्षेप घेत पोलिसांशी संपर्क साधला, त्यानंतर व्यंकट बालमूर यांना गाढवाच्या चोरीप्रकरणी अटक करण्यात आली. तत्पूर्वी, व्यंकट बालमूर यांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या वाढदिवसानिमित्त गाढवाच्या फोटोसह त्यांच्या धोरणांवर टीका करणारे ट्विट केले होते. 
 

Web Title: Congress leader who protested against KCR using a donkey, arrested for stealing it