शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

"जनतेची लूट, फक्त दोघांचा विकास"; LPG सिलिंडरच्या दरवाढीवरून राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 12:32 PM

Rahul Gandhi : एलपीजी सिलिंडरच्या दरात झाली वाढ, राहुल गांधींनी साधला मोदी सरकारवर निशाणा

ठळक मुद्देएलपीजी सिलिंडरच्या दरात झाली वाढपेट्रोल-डिझेलचे दरही वाढले

नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशवासीयांना महागाईचा दुहेरी फटका बसला आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २६ पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रूपयांची वाढ झाली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीनंतर आता विनाअनुदानित १४.२ किलोच्या घरघुती वापराच्या सिलिंडरची किंमत ७६९ रूपयांवर गेली आहे. यापूर्वी हे दर ७१९ रुपये इतके होते. आजपासूनच हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. यावरून काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.राहुल गांधी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला. "जनतेकडून लूट, फक्त दोघांचा विकास," असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. तसंच यासोबत एलपीजी सिलिंडरच्या वाढलेल्या दराचं वृत्तही त्यांनी शेअर केलं आहे. पेट्रोल-डिझेलही वाढलंआठवड्याभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. सोमवारी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २६ पैशांची वाढ झाली. दिल्लीत आता पेट्रोलचे दर ८९ रूपयांच्या जवळ पोहोचले आहे. इतकंच नाही दर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दरानं ९९ रूपयांचा तर काही ठिकाणी पेट्रोलच्या दरानं शंभरीही पार केली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीतही वाढ होताना आता दिसत आहे, भारतात पेट्रोलियम पदार्थांची किंमत भारतीय बास्केटमध्ये येणाऱ्या ज्या कच्च्या तेलावर अवलंबून आहे त्यावर दराचा परिणाम २० ते २५ दिवसांनंतर दिसतो. हे आहेत प्रमुख शहरांतील दरसोमवारी झालेल्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ८८.९९ रूपये आणि ७९.३५ रूपये प्रति लिटर इतके झाले आहेत. तर मुंबईत पेट्रोलचे दर ९५.४६ रूपये, डिझेलचे दर ८६.३४ रूपये प्रति लिटर, चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर ९१.१९ रूपये आणि डिझेलचे दर ८४.४४ रूपये, कोलकात्यात ९०.२५ रूपये आणि डिझेलचे दर ८२.९४ रूपये प्रति लिटर इतके झाले आहेत. गेल्या वर्षभरात पेट्रोलच्या दरात जवळपास १८ रूपयांची वाढ झाली आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीCylinderगॅस सिलेंडरPetrolपेट्रोलDieselडिझेल