राहुल गांधींनी डी.के. शिवकुमार यांच्यासोबत मारले पुश-अप्स; व्हिडिओ तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 11:26 IST2022-10-12T11:18:38+5:302022-10-12T11:26:44+5:30

राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेमुळे चर्चेत आले आहेत. ही यात्रा गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. या यात्रेतील अनेक व्हिडिओ, फोटो व्हायरल होत आहेत.

Congress leader Rahul Gandhi and d k shivakumar Exercise in Bharat Jodo Yatra video viral | राहुल गांधींनी डी.के. शिवकुमार यांच्यासोबत मारले पुश-अप्स; व्हिडिओ तुफान व्हायरल

राहुल गांधींनी डी.के. शिवकुमार यांच्यासोबत मारले पुश-अप्स; व्हिडिओ तुफान व्हायरल

राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेमुळे चर्चेत आले आहेत. ही यात्रा गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. या यात्रेतील अनेक व्हिडिओ, फोटो व्हायरल होत आहेत. कधी लहान मुलांसोबतचा फोटो तर पावसात सुरू असलेल्या भाषणाचे फोटो व्हायरल झाले आहेत. आता भारत जोड यात्रेतील अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. यात राहुल गांधीकाँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांच्यासोबत रस्त्यावर पुश-अप्स मारत असल्याचे दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये एका बाजूला ५२ वर्षीय राहुल गांधी आणि दुसऱ्या बाजूला कर्नाटक काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार, पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, अखिल भारतीय जोडो यात्रेवेळी एका मुलासोबत रस्त्यावर पुश-अप करताना दिसत आहेत. 

डी.के. शिवकुमार आणि के सी वेणुगोपाल जास्त पुश-अप्स मारत नसल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे राहुल गांधी आणि तो लहान मुलगा जास्त वेळ पुश-अप्स करत असल्याचे दिसत आहे. या घटनेचा  व्हिडिओ आणि फोटो काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी शेअर केला आहे. 

याआधी, दोन दिवसापूर्वी राहुल गांधी ७५ वर्षीय पक्षाचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्यासोबत दिसत आहेत.तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी पक्षाचा झेंडा हातात घेऊन डी.के. शिवकुमार यांच्यासोबत धावत असल्याचे दिसत आहे. तर काही दिवसापूर्वी राहुल गांधी आई सोनिया गांधी यांच्या शुजची फीत बांधताना दिसत आहेत.

सेक्युरीटी भेदत चिमुकल्याचा राहुल गांधींना गोड गोड पापा

काँग्रेसची भारत जोडो यात्रा गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. ही यात्रा सध्या कर्नाटकमधील पडाव याठिकाणी आहे. या यात्रेला तरुणांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांचा प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेतील एका लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक लहान मुलगा गर्दीतून येऊन राहुल गांधी यांचा  गोड गोड पापा घेत असल्याचे दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये सचिन पायलट, राहुल गांधी आणि काँग्रेसचे इतर नेते दिसत आहेत. राहुल गांधी यांच्या मध्यभागी आहेत, पण गर्दीतून मार्ग काढत सुरक्षा वर्तुळ तोडत एक लहान मुलगा पुढे येतो आणि राहुल गांधींना किस करत असल्याचे दिसत आहे.

Web Title: Congress leader Rahul Gandhi and d k shivakumar Exercise in Bharat Jodo Yatra video viral