शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

भाजप-आरएसएस आसामच्या अस्तित्वाला धोका; अखेर 'तो' मुद्दा प्रियांकांनी निवडणूक प्रचारातच उचलला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 6:22 PM

प्रियंका गांधी यांनी तेजपूर येथे एका मोठ्या रॅलीला संबोधित केले. प्रियंका म्हणाल्या, आसाम तुमची आई आहे आणि आपण आपली ओळख आणि अस्तित्वाचा बचाव करण्यासाठी लढत आहात. (Priyanka gandhi vadra)

 नवी दिल्ल - पूर्वेकडील राज्य पश्चिम बंगालसह आसाममध्येही (Assam) निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. काँग्रेसचा सर्वात मोठा चेहरा म्हणून प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka gandhi vadra) पूर्वेकडील राज्यांत दौराकरून अंदाजही घेत आहेत आणि वातावरण निर्मितीही करत आहेत. आज मंगळवारी प्रियंका गांधींचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो समोर आले. एवढेच नाही, तर त्यांनी यावेळी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधत भाजप (BJP) आणि आरएसएस (RSS) आसामच्या अस्तित्वाला धोका असल्याचे म्हटले आहे. (Congress leader Priyanka gandhi vadra Commented on bjp rss and caa)

प्रियंका यांनी एका स्थानीक वृत्त वाहिनीशी बोलताना, पंतप्रधानांच्या 'आसाममधील चहा धोक्यात आहे.' या विधानावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, एखादे ट्विट केलेल्या आसामचा चहा धोक्यात येत नाही. आसामच्या अस्तित्वावर जो घाव भाजप आणि आरएसएसने घातला आहे, तोच त्याच्या अस्तित्वाला धोका आहे. ना येथे डबल इंजिनचे सरकार हवे आहे, ना रिमोट कंट्रोल असलेले. आसामच्या जनतेला एक नेता, एक सीएम आणि एक पक्ष हवा आहे. जो त्यांच्या अस्तित्वाचे रक्षण करून त्यांच्यासाठी काम करील.

...म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाच्या "या" ज्येष्ठ नेत्याचा पुतळा जाळला, विरोधात केली घोषणाबाजी

CAA आणि NRCच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधताना प्रियंका म्हणाल्या, देशाची एकता त्यांच्यासाठी समस्या आहे. राज्याची एकताही त्यांच्यासाठी समस्या आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी संपूर्ण देशात CAA-NRCवर भाष्य केले. मग ते येथे आल्यानंतर गप्प का होतात. भाजपने निवडणुकीपूर्वी म्हटले होते, की आसाममध्ये NRC लागू करणार नाही. मग लागू का केली? असा सवालही प्रियांका यांनी भाजपला केला.

तेजपूरच्या रॅलीत काय म्हणाल्या प्रियांका? प्रियंका गांधी यांनी तेजपूर येथे एका मोठ्या रॅलीला संबोधित केले. प्रियंका म्हणाल्या, आसाम तुमची आई आहे आणि आपण आपली ओळख आणि अस्तित्वाचा बचाव करण्यासाठी लढत आहात. भाजपने आपल्याला दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. आम्ही आपल्याला आश्वासन नाही हमी देत आहोत. या पाच हमी आपले चांगले भविष्य घटविण्यासाठी आहेत.

आसाममध्ये काँग्रसेच्या प्रचाराला सुरुवात, प्रियांका गांधींनी केला आदिवासी झूमर डान्स, पाहा VIDEO

1- आम्ही असा कायदा तयार करू, ज्यामुळे येथे CAA लागू होणार नाही.2- आसाममधील गृहिणींसाठी दर महा 2000 रुपये गृहिणी सन्मान निधी दिला जाईल.3- 200 यूनिट वीज मोफत दिली जाईल. यातून दर महिन्याला 1400 रुपयांची बचत होईल.4- चहाच्या मळ्यात काम करणाऱ्यांसाठी 365 रुपये मजुरी दिली जाईल.5- आम्ही युवकांना 5 लाख रोजगार देऊ.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसAssamआसामBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ