शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"भाजप लोकशाहीची हत्या..."; मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 01:20 IST

"हे सर्व केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर घडले. ही लोकशाहीची हत्या नाही तर काय...?"

गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (१३ फेब्रुवारी २०२५) मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. या निर्णयावरून, देशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी म्हणाले, भाजप लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, गेल्या २० महिन्यांपासून काँग्रेस ज्याची मागणी करत होती ते अखेर घडले आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

प्रमोद तिवारी म्हणाले, "भाजप लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न करत आहे! मणिपूर सरकार अल्पमतात, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला! काँग्रेसने अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा केली होती. तरीही विरोधी पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी का दिली गेली नाही? भाजप सरकार स्थापन करू शकत नव्हता.  यामुळे त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करून सत्तेवर कब्जा केला! हे सर्व केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर घडले. ही लोकशाहीची हत्या नाही तर काय आहे?"

'परिस्थिती संभाळण्यास गृह मंत्री अयशस्वी' -याशिवया, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, "भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गेल्या २० महिन्यांपासून ज्याची मागणी करत होती, तेच घडले. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. सुप्रिम कोर्टाने राज्यात संवैधानिक यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाल्याचे म्हटल्यानंतर, हे घडले आहे. येथे ३ मे २०२३ पासून आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि ६०,००० हून अधिक पुरुष, महिला आणि मुले विस्थापित झाली आहेत. हे तेव्हा घडले, जेव्हा मणिपूरच्या सामाजिकतेवर गंभीर आघात झाला. हे तेव्हा घडले जेव्हा फेब्रुवारी 2022 मध्ये भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मोठे बहुमत मिळाले. मात्र, त्यांच्या राजकारणाने केवळ १५ महिन्यांतच ही भयानक दुर्घटना घडली.

याशिवाय, असे तेव्हा घडले, जेव्हा केंद्रीय गृहमंत्री मणिपूरची स्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान मोदी यांनी ही जबाबदारी त्यांना सोपवली होती. एवढेच नाही, तर हे तेव्हा घढले आहे, जेव्हा जग भरात फिरणारे पंतप्रधान, मणिपूरला जाण्यास आणि तेथे समेटाची प्रक्रिया सुरू करण्यास सतत नकार देत आहेत," असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसBJPभाजपा