भारतीय नागरिक भोळे भाबडे, सरकारच्या दाव्यांवर लगेच विश्वास ठेवतात: चिदंबरम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 15:54 IST2020-01-11T15:48:25+5:302020-01-11T15:54:44+5:30
सरकार विविध योजना जाहीर करून त्याचा गाजावाजा करत असते, आणि देशातील लोकं ही त्यावर विश्वास ठेवतात. प्रत्यक्षात मात्र या योजनांची अमलबजावणीचं होत नाही.

भारतीय नागरिक भोळे भाबडे, सरकारच्या दाव्यांवर लगेच विश्वास ठेवतात: चिदंबरम
नवी दिल्ली : भारतातील लोकं कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास करतात. आपल्या देशातील लोकांमध्ये असेलला भोळेपणा मी आतापर्यंत कुठेच पाहिला नसल्याचे काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम म्हणाले. सरकारकडून जाहीर करण्यात येणाऱ्या योजनेच्या अमलबजावणीबाबतच्या दाव्यांवर ते लगेच विश्वास ठेवतात असेही चिदंबरम म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, देशातील प्रत्येक गावात वीज पोहचली असल्याचा दावा केंद्रसरकाने केला आहे. तर भारतातील 99 टक्के कुटंब शौचालययाचं वापर करत असल्याचे सुद्धा सरकार सांगत आहे. लोकांनीही ह्या गोष्टींवर विश्वास ठेवला. असाच काही प्रकार आयुष्मान भारत योजनाबाबतीत घडत आहे.
माझ्या गाडीच्या ड्रायव्हरच्या वडिलांच्या सर्जरीसाठी प्रयत्न करूनही आयुष्मान भारत योजनेचा फायदा त्याला मिळाला नसल्याचे उदाहरण चिदंबरम यांनी दिले. जेव्हा त्याने हॉस्पिटलमध्ये या योजनाबद्दल माहिती घेतली तर, अशी काही योजना नसल्याचे त्याला सांगण्यात आले. परंतु आमचा अजूनही विश्वास आहे की संपूर्ण देशात आयुष्मान भारत योजना लागू झाली आहे. मात्र प्रत्यक्षात तसे नसल्याचे चिदंबरम म्हणाले.
सरकार विविध योजना जाहीर करून त्याचा गाजावाजा करत असते, आणि देशातील लोकं ही त्यावर विश्वास ठेवतात. प्रत्यक्षात मात्र या योजनांची अमलबजावणीचं होत नाही. मात्र तरीही लोकं सरकारच्या केल्या जाणाऱ्या दाव्यांवर विश्वास ठेवतात. त्यामुळे भारतातील लोकं खूप भोळे भाबडे असल्याचे चिदंबरम म्हणाले.