'नवज्योत सिंग सिद्धू म्हणजे पॉलिटिक्समधील राखी सावंत'; सिद्धूंच्या 'त्या' वक्तव्यावर आप नेत्याचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 07:42 PM2021-09-17T19:42:36+5:302021-09-17T19:44:19+5:30

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी राज्यात दुसऱ्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार असलेले आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला होता.

Congress leader Navjot singh sidhu is a Rakhi Sawant of Punjab politics  aap raghav chadha | 'नवज्योत सिंग सिद्धू म्हणजे पॉलिटिक्समधील राखी सावंत'; सिद्धूंच्या 'त्या' वक्तव्यावर आप नेत्याचा पलटवार

'नवज्योत सिंग सिद्धू म्हणजे पॉलिटिक्समधील राखी सावंत'; सिद्धूंच्या 'त्या' वक्तव्यावर आप नेत्याचा पलटवार

googlenewsNext

आगामी काळात निवडणुका होत असलेल्या राज्यांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष वाढू लागला आहे. जवळपास सर्वच राज्यांत हा संघर्ष बघायला मिळत आहे. शुक्रवारी असाच संघर्ष पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष असलेल्या आम आदमी पार्टीच्या नेत्यांमध्येही दिसून आला. यात, आम आदमी पक्षाचे राघव चढ्ढा यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांना पंजाबच्या राजकारणातील 'राखी सावंत' म्हटले आहे. (Congress leader Navjot singh sidhu is a Rakhi Sawant of Punjab politics aap raghav chadha)

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी राज्यात दुसऱ्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार असलेले आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला. सिद्धू म्हणाले, दिल्लीतही शेतकऱ्यांना निश्चित किमतीपेक्षा कमी भाव मिळत आहे. केजरीवाल सरकारने केंद्र सरकारचा खासगी मंडीचा कायदा लागू केला आहे. दिल्लीत शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे. यानंतर आम आदमी पार्टीचे प्रवक्ता आणि पक्षाचे पंजाब सह-प्रभारी राघव चड्ढा यांनी सिद्धूंवर पलटवार केला आहे.

कट्टरता जगासाठी सर्वात मोठं आव्हान; अफगाणिस्तान जिवंत उदाहरण; SCO समिटमध्ये PM मोदींचा प्रहार

राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावरून नवज्योत सिंग सिद्धूंना प्रत्युत्तर दिले आहे. पंजाबच्या राजकारणातील राखी सावंत नवज्योत सिंग सिद्धू यांना कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या विरोधात सातत्याने बोलल्याबद्दल काँग्रेस हायकमांडने फटकारले आहे. यानंतर त्यांनी (सिद्धू) अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले आहे. उद्यापर्यंत प्रतीक्षा करा, ते पुन्हा कॅप्टन अमरिंदर यांच्या विरोधात आक्रमक होतील, असे चड्ढा यांनी म्हटले आहे. 

राघव चड्ढांवर सिद्धूंचा निशाणा -
नवज्योत सिंग सिद्धू यांनी राघव चढ्ढा यांच्यावर पलटवार केला आहे. सिद्धू यांनी ट्विट करत म्हटले आहे, असे म्हटले जाते की मानव माकडांचा वंशज. राघव चढ्ढा यांचा उल्लेख करून ते म्हणाले, आपली बुद्धी पाहून माला विश्वास आहे, की तुम्ही आता त्यांचे वंशज आहात. सिद्धू पुढे म्हणाले, आपण अद्यापही आपल्या सरकारच्या वतीने कृषी कायदे अधिसूचित करण्यासंदर्भात माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही.


 

Web Title: Congress leader Navjot singh sidhu is a Rakhi Sawant of Punjab politics  aap raghav chadha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.