शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

“ना झुकणार, ना इंचभरही मागे हटणार,” तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सिद्धू यांनी घेतली राहुल-प्रियंका गांधींची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 08:35 IST

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी गुरुवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली.

Navjot Singh Sidhu Meets Rahul Gandhi And Priyanka Gandhi: काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी गुरुवारी (६ एप्रिल) पक्षाचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांची भेट घेतली. त्यांनी या भेटीचा एक फोटोही ट्वीट केला आहे, तसेच पंजाब आणि काँग्रेस नेत्यांबद्दलच्या त्यांच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला आहे. नुकतेच तुरुंगातून सुटलेल्या सिद्धू यांनी आपण एक इंचही मागे हटणार नसल्याचं सांगितले.मी देवाकडे मृत्यू मागितलाय, कॅन्सरशी झुंजत असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीची भावनिक पोस्ट

“आज नवी दिल्लीत माझे मेंटर आणि मित्र राहुलजी, मार्गदर्शक प्रियंकाजी यांची भेट घेतली. तुम्ही मला तुरुंगात टाकू शकता, मला धमकावू शकता, माझी सर्व आर्थिक खाती ब्लॉक करू शकता, पण पंजाब आणि माझ्या नेत्यांबद्दल माझी वचनबद्धता झुकणार नाही किंवा एक इंचही मागे हटणार नाही,” असं ट्वीट सिद्धू यांनी केलंय.

१० महिन्यांनंतर तुरुंगाबाहेरगेल्या वर्षी १९ मे रोजी सर्वोच्च न्यायालयानं नवज्योत सिंग सिद्धू यांना २७ डिसेंबर १९८८ च्या रोड रेज प्रकरणी एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. पटियाला येथील शेरावले मार्केटजवळ कार पार्किंगवरून झालेल्या वादात सिद्धू यांच्यावर ६५ वर्षीय गुरनाम सिंग यांच्या डोक्यात मारल्याचा आरोप आहे. यानंतर गुरनाम सिंग यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरनाम सिंग यांच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितलं गेलं. कनिष्ठ न्यायालय, नंतर उच्च न्यायालय आणि नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यांना दोषी ठरवल्यानंतर सिद्धू यांना सुमारे १० महिने पटियाला तुरुंगात काढावे लागले.

सिद्धू यांची १ एप्रिल रोजी तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सिद्धू पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. ४ एप्रिल रोजी सिद्धू यांनी पंजाबच्या तुरुंगांची व्यवस्था आणि सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले. पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट आणण्याचे प्रयत्न सुरू असून अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप सिद्धू यांनी केला. यासोबतच त्यांनी घटनात्मक संस्था कमकुवत केल्याचा आरोप केला. 

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस