"हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखड यांच्यावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 17:51 IST2024-12-11T17:50:23+5:302024-12-11T17:51:26+5:30

खर्गे म्हणाले, अध्यक्ष तर शाळेतील हेडमास्तर प्रमाणे वागतात आणि सभागृहाच्या कामकाजात अडथळाही तेच आणतात.

Congress leader Mallikarjun Kharge targets Jagdeep Dhankhada says Speaks like headmaster | "हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखड यांच्यावर निशाणा

"हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखड यांच्यावर निशाणा

राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास ठरवा सादर करण्यात आला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली टीएमसी, सपा, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसह अनेक पक्षांनी याचे समर्थन केले आहे. मंगळवारी राज्यसभा सेक्रेटरी जनरल यांना हा प्रस्तान देण्यात आला होता. यानंतर बुधवारी संसद सुरू होताच विरोधकांनी हा प्रस्ताव आणण्याची मागणी केली. मात्र गदारोळामुळे कामकाज पुढे सरकू शकले नाही. दरम्यान, अविश्वास प्रस्ताव आणण्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अध्यक्ष धनखड यांच्यावर अनेक आरोप केले. ते म्हणाले, अध्यक्ष तर शाळेतील हेडमास्तर प्रमाणे वागतात आणि सभागृहाच्या कामकाजात अडथळाही तेच आणतात.

खर्गे म्हणाले, "सभापती विरोधकांसमोर एखाद्या मुख्याध्यापकाप्रमाणे वागतात. विरोधी पक्षनेते 5 मिनिटे बोलले तर ते स्वत: नंतर 10 मिनिटे प्रवचन देतात. तुम्ही पत्रकार तर विद्वान आहात. सर्व गोष्टी जाणता. मला असे म्हणायचे आहे की, राज्यसभेत जे काही महत्त्वाचे विषय उपस्थित होतात, त्यावर सभापती चर्चाच होऊ देत नाहीत. विरोधी नेत्यांवर प्रश्न उपस्थित केले जातात. त्यांची निष्ठा सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांप्रति आहे. पुढील पदोन्नतीसाठी ते सरकारचे प्रवक्ते म्हणून कार्यरत आहेत. राज्यसभेत सभापती स्वतःच सर्वाधिक गदारोळ करतात. सभागृहात काही अडथळे येत असतील तर त्याचे सर्वात मोठे कारण आमचे अध्यक्ष आहेत."

खर्गे पुढे म्हणाले, "जगदीप धनखर इतरांना धडा शिकवतात, मात्र वारंवार अडथळे निर्माण करून संसद ठप्प केली जाते. सभापती आणि सत्ताधारी पक्ष नेहमीच असे प्रयत्न करतात. सहसा विरोधक अध्यक्षांकडे संरक्षण मागतात. तेच विरोधकांचे संरक्षक असतात. मात्र, जर तेच सत्ताधारी पक्षाचे आणि पंतप्रधानांचे उघडपणे कौतुक करत असतील तर विरोधकांचे कोण ऐकेल. विशेष म्हणजे 70 विरोधी खासदारांच्या पाठिंब्याने हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. राज्यसभेत एनडीएचे बहुमत आहे, मात्र विरोधकांनी आणलेल्या प्रस्तावामुळे सभापतींच्या प्रतिमेला तडा जातो.

Web Title: Congress leader Mallikarjun Kharge targets Jagdeep Dhankhada says Speaks like headmaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.