शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
3
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
4
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
5
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
6
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
7
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
8
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
9
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
10
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
11
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
12
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
13
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
14
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
15
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
16
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
17
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
18
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
19
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
20
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Daily Top 2Weekly Top 5

राहुलजी मला माफ करा, पण मी रोबोट नाही; काँग्रेसच्या महिला नेत्याकडून शैक्षणिक धोरणाचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 20:35 IST

काँग्रेस नेत्या खुशबू सुंदर यांच्याकडून सरकारच्या शैक्षणिक धोरणाचं कौतुक

नवी दिल्ली: मोदी सरकारनं काल नवं शैक्षणिक धोरण मंजूर केलं. तब्बल ३४ वर्षांनी देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. याबद्दल सध्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काँग्रेस नेत्या आणि अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी नव्या शैक्षणिक धोरणाचं स्वागत केलं आहे. पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळं मतं मांडल्याबद्दल त्यांनी ट्विट करून काँग्रेसचे खासदार राहुल गांधींची माफीदेखील मागितली आहे. नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल माझी भूमिका पक्षापेक्षा वेगळी आहे. त्यासाठी मी राहुल गांधींची माफी मागते. मात्र मी कटपुतली किंवा रोबोटप्रमाणे मान  न डोलावता तथ्यांवर भाष्य करते. प्रत्येक मुद्द्यावर आम्ही आमच्या नेत्याशी सहमत असू शकत नाही. मात्र नागरिक म्हणून आपलं मत व्यक्त करू शकतो, असं सुंदर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

राजकारण केवळ गोंधळ घालण्यासाठी नाही. राजकारणात एकत्र येऊनही काम करायला हवं, असं मत सुंदर यांनी त्यांच्या दुसऱ्या ट्विटमधून व्यक्त केलं आहे. 'राजकारण म्हणजे निव्वळ गोंधळ नव्हे, ही गोष्ट भाजपा आणि पंतप्रधान कार्यालयानं समजून घ्यायला हवी. विरोधी पक्ष म्हणून आम्ही याकडे बारकाईनं लक्ष घालू आणि त्यातल्या त्रुटी दाखवू. सरकारनं नव्या शैक्षणिक धोरणेबद्दलच्या त्रुटींवरून प्रत्येकाला विश्वासात घ्यायला हवं,' असं सुंदर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.खुशबू सुंदर यांनी त्यांच्या पुढील ट्विटमध्ये विरोधी पक्षाच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे. 'मी सकारात्मक पैलू पाहते. मला ते आवडतं. सकारात्मक बाबींकडे पाहून मी नकारात्मक गोष्टींवर काम करते. आपल्याला केवळ आवाज उठवायचा नाही, तर समस्यांवरील उपायदेखील सांगायचे आहेत. देशाच्या भविष्यासाठी काम करण्याची जबाबदारी विरोधी पक्षाचीदेखील आहे,' असं सुंदर यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.नव्या शैक्षणिक धोरणाचं स्वागत करणाऱ्या सुंदर यांनी आपण भाजपामध्ये जाणार नसल्याचं पुढील ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे. 'संघाशी संबंधित मंडळी रिलॅक्स राहू शकतात. पण त्यांनी आनंदीत होऊ नये. मी भाजपात जाणार नाही. माझं मत पक्षापेक्षा वेगळं असू शकतं. कारण मी स्वतंत्र मतं असणारी व्यक्ती आहे. नव्या शैक्षणिक धोरणात त्रुटी आहेत. पण आम्ही सकारात्मकपणे बदलांकडे पाहू शकतो,' असं सुंदर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी