शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

...तर ऐका मोदीजी, काँग्रेसनं 70 वर्षांमध्ये काय काय केलं; काँग्रेसचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 8:39 AM

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचं पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर

लखनऊ: काँग्रेसनं 70 वर्षांमध्ये काय केलं, असा प्रश्न नरेंद्र मोदी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांपासून सव्वासो करोड देशवासीयांना विचारत आहेत. त्यांच्या या प्रश्नाला काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्हाला सत्तेत येऊन पावणे पाच वर्ष झाली. तरीही काँग्रेसनं 70 वर्ष काय केलं, हाच प्रश्न तुम्ही विचारता, असं म्हणत आझाद यांनी स्वातंत्र्यापासून काँग्रेसनं केलेल्या कामांची यादीच दिली.काँग्रेसनं आतापर्यंत काय काय केलं, हे एकदा ऐकाच मोदीजी. तुम्ही ज्या देशाचे पंतप्रधान आहेत, ज्याला आपण भारत म्हणतो, त्या देशाच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचं योगदान मोठं आहे. गांधीजींच्या नेतृत्त्वाखाली आम्ही इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरु देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा देश अनेक तुकड्यांमध्ये विभागलेला होता. त्याला काँग्रेसनं एकसंध रुप दिलं. तुम्ही आज एका तुकड्याचे पंतप्रधान नाहीत. याचं श्रेय काँग्रेसला जातं, असं प्रत्युत्तर आझाद यांनी दिलं.आम्ही एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राची निर्मिती केली. या देशाला एक अशी घटना दिली, की त्यामुळे सर्वांना स्वातंत्र्य आणि समानता मिळालं. दलित, शोषित आणि शेतकऱ्यांसाठी फार काम झालं नाही, असं मोदी म्हणतात. मी त्यांना सांगू इच्छितो, गांधीजींनी स्वातंत्र्य मिळण्याआधीच दलितांच्या हक्कासाठी संघर्ष सुरू केला होता. आम्ही घटनेची अंमलबजावणी सुरू करताच दलितांना आरक्षण दिलं. त्यांना शिष्यवृत्ती दिली. त्यांच्या प्रगतीसाठी कायदे केले. अस्पृश्यतेविरोधीत कायद्याची निर्मिती केली. यानंतरही तुम्ही आम्हालाच विचारता काय केलं? आम्ही घटनेच्या आधारे देश चालवला. धर्माच्या नावानं देश चालवला नाही, अशा शब्दांमध्ये काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या कामांचा उल्लेख आझाद यांनी भाजपावर हल्ला चढवला. राहुल गांधींच्या सूचनेवरुन आम्ही जमीन अधीग्रहण कायदा केला. आश्वासनं द्यायची आणि मग ती सोयीस्करपणे विसरुन जायची, असं भाजपासारखं राजकारण आम्ही करत नाही. काळ्या पैशाचं काय झालं? रोजगार संधींचं काय झालं? शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणार होतात. त्याचं काय झालं? आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. सत्तेवर येताच अवघ्या काही तासांमध्ये आश्वासनांची पूर्तता केली. सध्या आम्ही जाहीरनाम्यावर काम करत आहोत. लवकर तो जनतेसमोर आणू, असं आझाद यांनी पत्रकारांना सांगितलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस