शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

"माझं ऐकलं नाही, तर पुढचे 50 वर्ष काँग्रेस सत्तेवर येणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 20:24 IST

निवडणूक व्हायला हवी. कारण, असेही होऊ शकते, की नियुक्त करण्यात आलेल्या काँग्रेस अध्‍यक्षाला एक टक्काही सपोर्ट नाही. जर निवडून आलेल्या घटकांनी पक्षाचे नेतृत्व केले, तर पक्षाची स्थिती सुधारेल.

ठळक मुद्देआझाद म्हणाले, असेही होऊ शकते, की नियुक्त करण्यात आलेल्या काँग्रेस अध्‍यक्षाला एक टक्काही सपोर्ट नाही.आझाद म्हणाले, पूर्वपदावर यायचे असेल तर निवडणूक होणे आवश्यक.निवडणूक झाली, तर अनेक नेते गायब होतील - आझाद

नवी दिल्‍ली -काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. काँग्रेस कार्यसमितीसह संघठनेतील मुख्य पदांसाठी निवडणूक व्हायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर जे लोक निवडणुकीला विरोध करत आहेत, त्यांना आपले पद जाण्याची भीती वाटते. निवडणूक व्हायला हवी. कारण, असेही होऊ शकते, की नियुक्त करण्यात आलेल्या काँग्रेस अध्‍यक्षाला एक टक्काही सपोर्ट नाही. जर निवडून आलेल्या घटकांनी पक्षाचे नेतृत्व केले, तर पक्षाची स्थिती सुधारेल. 'अन्यथा काँग्रेस पुढील 50 वर्ष विरोधातच बसत राहील,' असेही आझाद म्हणाले.

'पूर्वपदावर यायचे असेल तर निवडणूक होणे आवश्यक' -गुलाम नबी आझाद म्हणाले, "गेल्या अनेक दशकांपासून, पक्षात निवडून आलेले घटक नाहीत, कदाचित आपल्याला 10-15 वर्षांपूर्वीच असे करायला हवे होते. आता आपण एका पाठोपाठ एक निवडणुका हरत आहोत. जर आपल्याला पुन्हा पूर्वपदावर यायचे असेल तर निवडणुका घेऊन पक्षाला बळकटी द्यावी लागेल. जर माझ्या पक्षाची पुढील 50 वर्षांपर्यंत विरोधात बसण्याची इच्छा असेल तर पक्षांतर्गत निवडणुका घेण्याची काहीही आवश्यकता नाही."

'मला पक्षाध्यक्ष व्हायचं नाही' - आझाद म्हणाले, "मी एकदा मुख्यमंत्री राहिलो आहे, केंद्रीय मंत्री राहिलो आहे, पक्षात सीडब्‍ल्‍यूसी सदस्‍य आणि महासचिवही होतो. मला माझ्यासाठी कसलीही अपेक्षा नाही. मी पुढचे 5 ते 7 वर्ष सक्रिय राजकारणात राहील. माझी पक्षाध्यक्ष होण्याची इच्छा नाही. एका खऱ्या काँग्रेसी प्रमाणे, पक्षाच्या हितासाठी निवडणूक व्हावी, अशी माझी इच्छा आहे."

'पक्षाचा पुढील अध्यक्ष निवडणूक जिंकून व्हावा' -एएनआय या वृत्त संस्थेशी बोलताना आझाद म्हणाले, "जेव्हा तुम्ही निवडणूक लढता, तेव्हा किमान 51 टक्के तुमच्या बाजूने असतात. इतर उमेदवारांना 10 किंवा 15 टक्केच मते मिळतात. जो जिंकेल आणि पक्षाध्यक्ष होईल त्याच्यासोबत 51 टक्के लोक असतील. मात्र, यावेळी जो कुणी पक्षाध्यक्ष होईल त्याच्या बाजूने एक टक्काही समर्थन नसेल. जर CWC चे सदस्य निवडून आले, तर त्यांना बाजूला केले जाऊ शकत नाही. यात समस्या कुठे?"

निवडणूक झाली, तर अनेक नेते गायब होतील -यावेळी निवडणुकीला विरोध करणाऱ्या नेत्यांनाही आझादांनी फैलावर घेतले. आझाद म्हणाले, जे प्रामाणिक असल्याचा दावा करत आहेत, खरे तर ते खालच्या पातळीचे राजकारण करत आहेत. तसेच ते पक्ष आणि देश हितासाठी धोकादायक आहेत. तसेच, "जे पदाधिकारी अथवा राज्‍यातील संस्थांचे घटक आमच्या प्रस्तावाला विरोध करत आहेत, त्यांना माहीत आहे, की निवडणूक झाली तर ते पदावर राहणार नाही. काँग्रेससोबत जो एकनिष्ठ आहे, तो पत्राचे स्वागत करील. मी म्हटले आहे, की राज्‍य, जिल्हा आणि ब्‍लॉक पातळीवर अध्‍यक्षांची निवड पक्ष कार्यकर्त्यांनी करायला हवी."

महत्त्वाच्या बातम्या -

खूशखबर! : स्वस्तात सोनं विकत घेण्याची संधी! पुन्हा सुरू होतेय मोदी सरकारची 'ही' खास योजना

घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार

मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण

खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण

CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्‍ट नसल्याचा दावा

टॅग्स :congressकाँग्रेसNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीIndiaभारतSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी