congress leader bhai jagtap slams bjp after its karnataka minister resigns in Sex CD Scandal | "काँग्रेसनं कर्नाटकाला IT Hub बनवलं; भाजपा कर्नाटकाला Porn Hub बनवतेय!!"

"काँग्रेसनं कर्नाटकाला IT Hub बनवलं; भाजपा कर्नाटकाला Porn Hub बनवतेय!!"

मुंबई/बंगळुरू: कर्नाटकमध्ये एका आक्षेपार्ह सीडी प्रकरणावरून (Karnataka Sex CD Scandal) मोठी खळबळ उडाली आहे. जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांची सीडी समोर आल्यानं त्यांना राजीनामा द्यावा लागला. आपल्या बदनामीसाठी राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा जारकीहोळींनी सुरुवातीला केला होता. मात्र या प्रकरणामुळे सरकारच्या अडचणी वाढू लागल्यानं अखेर जारकीहोळींना राजीनामा द्यावा लागला.

आक्षेपार्ह सीडीमुळे भाजप नेत्याला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी ट्विट करत सणसणीत टोला लगावला आहे. 'काँग्रेसनेकर्नाटकाला IT Hub बनवले. भाजपा कर्नाटकाला Porn Hub बनवत आहे..!!', असं जगताप यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. कर्नाटकची ओळख आयटी हब अशी आहे. कर्नाटकची ही ओळख आणि भाजप नेत्याचा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण यावरून जगताप यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे.



आक्षेपार्ह सीडी प्रकरण भाजपाच्या मंत्र्याला भोवलं; रमेश जारकीहोळी यांचा राजीनामा

काय आहे प्रकरण?
नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी हे सीडी प्रकरण मीडियासमोर आणलं. तसंच, दिनेश कलहळ्ली यांनी रमेश जारकीहोळी यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे. रमेश जारकीहोळी यांनी नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला. ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेड (KPTCL) मध्ये तरुणीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून शारिरिक संबंध ठेवण्यास सांगितल्याचा आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. यासंदर्भात दिनेश कलहळ्ळी यांनी रमेश जारकीहोळी यांची एक सीडी व्हायरल केली आहे. यामध्ये रमेश जारकीहोळी हे एका तरुणीला शरीरसंबंध ठेवण्याबाबत बोलत असल्याचा दावा केला आहे.

संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी आपल्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांत तक्रार केली, असं दिनेश कलहळ्ळी यांनी म्हटलं आहे. बंगळुरुचे पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रारही दाखल केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तातडीने तपास करावा आणि पीडित तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी दिनेश कलहळ्ळी यांनी केली आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: congress leader bhai jagtap slams bjp after its karnataka minister resigns in Sex CD Scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.