पंतप्रधान मोदींनी सर्वांत आधी कोरोना लस का घेतली नाही; काँग्रेसचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 17:18 IST2021-03-01T17:12:33+5:302021-03-01T17:18:15+5:30
केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिल्यानंतर देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा ०१ मार्चपासून सुरू झाला. दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाची लस घेतली. यानंतर आता राजकारण सुरू झाले असून, काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

पंतप्रधान मोदींनी सर्वांत आधी कोरोना लस का घेतली नाही; काँग्रेसचा सवाल
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिल्यानंतर देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा ०१ मार्चपासून सुरू झाला. दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधाननरेंद्र मोदींनी कोरोनाची लस घेतली. यानंतर आता राजकारण सुरू झाले असून, काँग्रेसनेपंतप्रधाननरेंद्र मोदींवर टीका केली आहे. (congress leader adhir ranjan criticised pm narendra modi over covaxin corona vaccine)
लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन कोरोना लस घेतल्यावरून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांत आधी लस घ्यायला हवी होती. शास्त्रज्ञांनी कोरोना लस सुरक्षित असल्याचे सांगितल्यावर कोरोना लस घेतली. शास्त्रज्ञांच्या समितीने कोरोना लसीवर प्रश्न उपस्थित केले होते. आम्ही नाही, असा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना लस घेतल्याचे आम्ही स्वागत करतो, असे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले.
जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे मोदी सरकार लुटारू; नाना पटोलेंची टीका
गितांजली हातात धरायला हवे होते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोरोना लस घेतली. केरळ आणि पुदुच्चेरी येथील नर्स आणि आसाममधील गमछा होता. मी तर म्हणेन की, पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध पुस्तक गितांजली हातात धरायला हवे होती, असा टोला अधीर रंजन चौधरी यांनी लगावला.
भाजपचा पलटवार
काँग्रेसकडून करण्यात आलेल्या टीकेवर भाजपकडून पलटवार करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी अधीर रंजन चौधरी यांच्या टीकेला उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या कृतीतून सर्वांना उत्तर दिले आहे. कोरोना योद्धांना प्राधान्यक्रम दिला पाहिजे. मी माझ्या टर्नची वाट पाहत आहे, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्यासह अनेक नेत्यांनी कोरोना लस घेतल्याची माहिती मिळाली आहे.