शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांची जीभ घसरली; पंतप्रधानांना म्हणाले 'पागल मोदी', राजकारण पेटणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 13:58 IST

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी अनेकदा वादक्रस्त विधान करत आले आहेत.

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने 2000 ची नोट चलनातून बाद केली आहे. या निर्णयावरुन काँग्रेस केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहे. पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनीही यावर टीका करताना पीएम मोदींवर वादग्रस्त टीका केली आहे. देशाची अर्थव्यवस्था सध्या ठीक नाही आणि अशा परिस्थितीत 2000 च्या नोटा बंद करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. हा मोदी नसून पागल मोदी आहे, अशी टीका त्यांनी केली.

अधीर रंजन चौधरी लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आहेत आणि त्यांनी संसदेत अनेकवेळा सरकारवर टीका करताना तुम्ही ऐकले असेल. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अधीर रंजन अनेकदा चर्चेत आले आहेत. आता त्यांच्या ताज्या वक्तव्यावरुन राजकारण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय चुकीचा आहे. हा निर्णय घ्यायला नको होता. 

अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या बैठका आणि तिसर्‍या आघाडीच्या शक्यतांबाबत म्हटले की, काँग्रेसशिवाय विरोधी पक्ष असू शकत नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबतची बैठक पाटण्यातही निश्चित करण्यात आली होती. मात्र आता ती बैठक दिल्लीत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अधीर रंजन चौधरी म्हणाले की, केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीने काहीही होणार नाही. त्यांनीही आमच्यासोबत यावे यासाठी आम्ही प्रयत्न करू. 2024 मध्ये काही बदल होऊ शकतात, यासंदर्भात विरोधी पक्षांमध्येही चर्चेला सुरुवात झाली आहे.

28 मे रोजी संसद भवनाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. विरोधी पक्षांनी ताकद दाखवण्यासाठी ही तारीख योग्य मानली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि विरोधी पक्ष नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती आहे. या दिवशी विरोधी पक्षांचे नेते एकत्र येऊन भाजपविरोधात तिसरी आघाडी स्थापन करतील. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनेक विरोधी नेत्यांशी चर्चा केली आहे. अलीकडेच त्यांनी दिल्लीत येऊन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली.    

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी