शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'राहुल गांधींना लाँच करण्यासाठी काँग्रेसकडून गुजरातमध्ये हिंसाचार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 21:20 IST

गुजरातमधून उत्तर भारतीय पलायन करत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं. गुजरातमधील परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरलं असून, देशातील व्यवस्था आणि अर्थव्यवस्था कोसळल्याची टीका राहुल गांधींनी केली होती.

नवी दिल्ली- गुजरातमधून उत्तर भारतीय पलायन करत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं. गुजरातमधील परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरलं असून, देशातील व्यवस्था आणि अर्थव्यवस्था कोसळल्याची टीका राहुल गांधींनी केली होती. काँग्रेसच्या याच आरोपाला भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस देशाला विभाजित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा पलटवार भाजपानं केला आहे. तसेच गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर झालेल्या हल्ल्यात काँग्रेसचा हात आहे. राहुल गांधींना लाँच करण्यासाठी काँग्रेसनं उत्तर भारतीयांवर हल्ले चढवले, असा आरोप भाजपानं केला आहे.काँग्रेस पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी लोकांना भडकावण्याचं काम केलं आहे. गुजरातमध्ये उफाळून आलेल्या हिंसाचारामागे काँग्रेसचा हात आहे. तसेच या प्रकाराला अल्पेश ठाकोर कारणीभूत आहे. काँग्रेस पक्ष शहरातल्या नक्षल्यांना आर्थिक मदत करत असल्याचा गंभीर आरोपही भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. मंदसोरमध्ये काँग्रेस आमदारानं लोकांना भडकावण्यासह परिसरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व प्रकाराच्या मागे राहुल गांधींना लाँच करण्याचा उद्देश आहे.काँग्रेसच्या तीन 'सी'चा भांडाफोड झाला आहे. ज्यात अफरातफरी, षड्यंत्र, धोका या तीन गोष्टींचा समावेश आहे. गुजरातमधील उत्तर भारतीयांवरील हल्ल्यानंतर 20 हजारांहून जास्त प्रवासी आपापल्या राज्यांत परतले आहेत. परंतु राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी सुरक्षा प्रदान करणार असल्याचं सांगत त्यांना परत गुजरातमध्ये येण्याचं आवाहन केलं आहे. 

काय आहे प्रकरण ?गुजरातच्या साबरकांठा येथे 28 सप्टेंबर रोजी 14 महिन्यांच्या चिमुकलीवर एका बिहारी कामगाराने बलात्कार केला होता. त्यानंतर नेहमीच शांत, संयमी असलेल्या गुजरातींचाही राग अनावर झाला. त्यामुळे युपी-बिहारी नागरिकांना गुजरात सोडून देण्याचा इशारा देण्यात आला. विशेष म्हणजे गुजरातमधील 11 जिल्ह्यांत ही मोहीम तीव्र झाली असून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत 50 हजार उत्तर भारतीयांनी गुजरात सोडल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Sambit Patraसंबित पात्राBJPभाजपा