Kanhaiya Kumar : "12 कोटींची कार, 10 लाखांचा सूट, 1.5 लाखांचा चष्मा असलेल्या फेक फकीराला टी-शर्टचा त्रास" 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 11:03 AM2022-09-10T11:03:38+5:302022-09-10T11:14:36+5:30

Congress Kanhaiya Kumar And Narendra Modi : काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदींवर घणाघात केला आहे.

Congress Kanhaiya Kumar Slams BJP Narendra Modi Over Rahul Gandhi Statement | Kanhaiya Kumar : "12 कोटींची कार, 10 लाखांचा सूट, 1.5 लाखांचा चष्मा असलेल्या फेक फकीराला टी-शर्टचा त्रास" 

Kanhaiya Kumar : "12 कोटींची कार, 10 लाखांचा सूट, 1.5 लाखांचा चष्मा असलेल्या फेक फकीराला टी-शर्टचा त्रास" 

googlenewsNext

भाजपानेकाँग्रेस नेते राहुल गांधीवर (Rahul Gandhi) जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधींच्या टीशर्टवर निशाणा साधला. भाजपाने ब्रँडसोबत राहुल गांधींचा त्या टीशर्टमधील फोटो आणि टीशर्टचा फोटो शेअर केला आहे. टीशर्टची किंमत ४१,२५७ रूपये असल्याचा आरोप भाजपाने केला असून यावर टीकास्त्र सोडत ‘भारत देखो’ असं म्हटलं आहे. यानंतर आता काँग्रेस नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर बोचरी टीका केली आहे. "12 कोटींची कार, 10 लाखांचा सूट आणि 1.5 लाखांचा चष्मा असलेल्या फेक  फकीराला टी-शर्टचा त्रास!" असं म्हटलं आहे.  

काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार (Congress Kanhaiya Kumar) यांनी भाजपा (BJP) आणि नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) घणाघात केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "12 कोटींची कार, 10 लाखांचा सूट आणि 1.5 लाखांचा चष्मा असलेल्या फेक फकीराला टी-शर्टचा त्रास! साहेब, तुम्हाला पाहिजे तेवढा गोंधळ करा, मुद्दा तुमच्या आणि आमच्या कपड्यांचा नाही. तो 140 कोटी लोकांच्या 'रोटी, कपडा आणि मकान'चा आहे. आम्ही त्या मार्गावर अडून राहू" असं कन्हैया कुमार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

"राहुल गांधींबद्दल भाजपाचे भय संपत नाही; 'भारत जोडो यात्रे'मुळे धडकी भरली"

 काँग्रेसचे नेते नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "भाजपाचे भय संपत नाही...! राहुल गांधींबद्दल टीशर्टची किंमत वगैरे असे टुकार मुद्दे भाजपला काढावे लागणे यातूनच सिद्ध होतंय की 'भारत जोडो यात्रे'मुळे भाजपाला धडकी भरली आहे राहुल गांधींबद्दल भाजपाचे भय संपत नाही.... आणि आठवण करूनच द्यायची झाली तर आपल्या देशाला एक असे फकीर लाभले आहेत जे 10 लाख रुपयांचा सुट परिधान करतात" असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 

"भारत जोडो यात्रेमुळे भाजपमध्ये भीती निर्माण झाली"

"भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणात आलेल्या लोकांना पाहून घाबरलात का? मुद्द्याचं बोला. बेरोजगारी आणि महागाईवर बोला. कपड्यांची चर्चा करायची असेल तर मोदींच्या 10 लाखांचा सूट आणि 1.5 लाखांच्या चष्म्यापर्यंत गोष्ट जाईल. सांगा यावर बोलायचं आहे का?" असं काँग्रेसने म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सूट आणि चष्माही पाहिला आहे. भारत जोडो यात्रेमुळे भाजपमध्ये भीती निर्माण झाली असल्याची टीका काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली.


 

Web Title: Congress Kanhaiya Kumar Slams BJP Narendra Modi Over Rahul Gandhi Statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.