मनोहर पर्रीकर जळूप्रमाणे खुर्चीला चिकटलेत,काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 11:39 IST2018-12-22T11:13:51+5:302018-12-22T11:39:16+5:30

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे.

congress jaipal reddy says Manohar Parrikar sticking to chair like a leech | मनोहर पर्रीकर जळूप्रमाणे खुर्चीला चिकटलेत,काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

मनोहर पर्रीकर जळूप्रमाणे खुर्चीला चिकटलेत,काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

नवी दिल्ली - काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. मनोहर पर्रीकर नैतिकतेच्या गोष्टी करतात, मात्र मनोहर पर्रीकर यांचं जळूप्रमाणे खुर्चीला चिकटून राहणं यामध्ये कोणती नैतिकता आहे, अशा बोचऱ्या शब्दांत जयपाल रेड्डी यांनी टीका केली आहे. जयपाल रेड्डी यांनी मनोहर पर्रीकर यांच्यावर आरोपही केलाय की, गोव्यामध्ये मुख्यमंत्रिपदाची आपली खुर्ची वाचवण्यासाठी पर्रीकर राफेल लढाऊ विमानांच्या कराराच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहेत. गुरुवारी मडगाव येथे पार्टीच्या 'जन आक्रोश' रॅली कार्यक्रमात संबोधित करताना त्यांनी हे विधान केलेले आहे. 

(... आणि पर्रीकरांनी मंत्र्यांमधील खदखद प्रत्यक्ष अनुभवली)



आजारी असूनही पर्रीकर मुख्यमंत्री पद सोडत नसल्याने गोव्याच्या प्रशासनावर परिणाम होते आहे, असंही रेड्डी यांनी म्हटलं आहे.



 

Web Title: congress jaipal reddy says Manohar Parrikar sticking to chair like a leech