काँग्रेसच्या उत्पन्नात १७१% वाढ; तरीही भाजपच ठरला अव्वल, ७४.५७ टक्के उत्पन्न हे एकट्या भाजपचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 07:50 IST2025-02-18T07:50:07+5:302025-02-18T07:50:41+5:30
भाजपने २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ४,३४०.४७३ कोटी रुपये उत्पन्न जाहीर केले; परंतु त्यापैकी फक्त ५०.९६ टक्के म्हणजे २,२११.६९ कोटी रुपये खर्च केले आहेत.

काँग्रेसच्या उत्पन्नात १७१% वाढ; तरीही भाजपच ठरला अव्वल, ७४.५७ टक्के उत्पन्न हे एकट्या भाजपचे
नवी दिल्ली : २०२३-२४ या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पक्षांमध्ये भाजपने सर्वाधिक उत्पन्न मिळविले असून, ते ४,३४०.४७ कोटी इतके आहे. सहा राष्ट्रीय पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या ७४.५७ टक्के उत्पन्न हे एकट्या भाजपचे आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
भाजपने २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ४,३४०.४७३ कोटी रुपये उत्पन्न जाहीर केले; परंतु त्यापैकी फक्त ५०.९६ टक्के म्हणजे २,२११.६९ कोटी रुपये खर्च केले आहेत. काँग्रेसचे एकूण उत्पन्न १,२२५.१२ कोटी रुपये होते, तर वर्षभराचा त्यांचा खर्च १,०२५.२५ कोटी रुपये किंवा एकूण उत्पन्नाच्या ८३.६९ टक्के होता, असे अहवालात म्हटले आहे. राष्ट्रीय पक्षांच्या उत्पन्नाचा मोठा भाग निवडणूक रोख्यांद्वारे, देणग्यांमधून आला आहे.
४,५०७.५६ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे वटवले
एडीआरने दाखल केलेल्या आरटीआय अर्जाच्या उत्तरात स्टेट बँक ऑफ इंडियाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ आर्थिक वर्षात विविध राजकीय पक्षांनी ४,५०७.५६ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे वटवले आहेत. या रकमेपैकी ५५.९९ टक्के हा राष्ट्रीय पक्षांचा वाटा होता.
पक्ष एकूण उत्पन्न केलेला खर्च शिल्लक रक्कम
भाजप ४३४० कोटी २२११ कोटी ४९.०४%
काँग्रेस १२२५ कोटी १०२५ कोटी १६.३१%
माकप १६७ कोटी १२७ कोटी २४.०७%
बसपा ६४ कोटी ४३ कोटी ३३.३३%
आप २२ कोटी ३४ कोटी -५०%
पक्षांना सर्वाधिक पैसे कुठून मिळाले?
भाजप स्वेच्छेने देणगी ३,९६७ कोटी ९१%
काँग्रेस अनुदान, देणग्या १,१२९ कोटी ९२%
माकप अनुदान, देगण्या ७४ कोटी ४४%
बसपा शुल्क व सदस्यत्व २६ कोटी ४१%
आप अनुदान २२ कोटी ९७%
कोणत्या पक्षाचे उत्पन्न वाढले?
आर्थिक वर्ष २०२२-२३ आणि २०२३-२४ दरम्यान भाजपच्या उत्पन्नात ८३.८५ टक्क्यांची (१९७९ कोटी) वाढ झाली आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या उत्पन्नातही ४५२ कोटी रुपयांवरून १२२५ कोटी रुपयांपर्यंत म्हणजेच १७१ टक्के इतकी वाढ झाली आहे.
माकपच्या उत्पन्नात १८ टक्क्यांनी वाढ आहे. आप आणि बसपाच्या उत्पन्नात मात्र अनुक्रमे २४ आणि २३ टक्के घट झाली आहे.
भाजप निवडणूक/सामान्य प्रचार १,७५४ कोटी
काँग्रेस निवडणूक खर्च ६१९ कोटी
माकप प्रशासकीय खर्च ५६ कोटी
बसपा निवडणूक खर्च २३ कोटी
आप प्रचार खर्च १९ कोटी
भाजप निवडणूक/सामान्य प्रचार १,७५४ कोटी
काँग्रेस निवडणूक खर्च ६१९ कोटी
माकप प्रशासकीय खर्च ५६ कोटी
बसपा निवडणूक खर्च २३ कोटी
आप प्रचार खर्च
१९ कोटी