राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसआमदारांकडून क्रॉस व्होटिंग झाल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे भाजपाला एका जागेऐवजी दोन जागा जिंकता आल्या. ओडिशामध्ये झालेल्या क्रॉस व्होटिंगच्या प्रकरणात काँग्रेसने तीन आमदारासह एका नेत्यावर कारवाई केली आहे. तीन आमदारांना निलंबित करण्यात आले असून, एका नेत्याची हकालपट्टी केली आहे.
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याच्या प्रकरणात आमदार सोफिया फिरदौस, आमदार रमेश जेना आणि आमदार दाशरथी गमांग यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर कटक शहराध्यक्ष अध्यक्ष गिरिबाला बेहरा यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते अरविंद दास यांनी सांगितले की, तीनही आमदारांनी व्हीपचे (पक्षादेश) उल्लंघन केले. तिन्ही आमदारांना निलंबित करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसकडे परवानगी मागण्यात आली होती. पक्षश्रेष्ठींकडून परवानगी मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली.
आमदार रमेश जेना हे सनाखेमुंडी मतदारसंघाचे आमदार आहेत. बराबती कटक मतदारसंघाच्या आमदार सोफिया फिरदौस आणि मोहना मतदारसंघाचे आमदार दाशरथी गमांग यांच्यावर क्रॉस व्होटिंगचा ठपका ठेवण्यात आला आहे. क्रॉस व्होटिंगमुळे बिजू जनता दलाचे उमेदवार डॉ. दत्तेश्वर होटा पराभूत झाले.
आमदारकी जाणार
या तिन्ही आमदारकी जाणार असल्याचे दिसत आहे. कारण काँग्रेस ओडिशा विधानसभेच्या अध्यक्षांना त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याचे पत्र दिले आहे. पक्षाने व्हीप जारी केल्यानंतर त्याचे पालन आमदारांना करावे लागते. व्हीपचे उल्लंघन करून कुठल्या आमदाराने क्रॉस व्होटिंग किंवा पक्ष विरोधी काम केले तर त्याचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते.
Web Summary : Following Rajya Sabha cross-voting, Congress suspended MLAs Sofia Firdous, Ramesh Jena, and Dasarathi Gamango. Cuttack city president Giribala Behera was expelled for violating the party whip. Action followed national Congress approval after a BJP candidate victory.
Web Summary : राज्यसभा में क्रॉस वोटिंग के बाद, कांग्रेस ने विधायक सोफिया फिरदौस, रमेश जेना और दशरथ गमांग को निलंबित कर दिया। कटक शहर अध्यक्ष गिरिबाला बेहरा को पार्टी के आदेश का उल्लंघन करने पर निष्कासित कर दिया गया। भाजपा उम्मीदवार की जीत के बाद राष्ट्रीय कांग्रेस की मंजूरी के बाद कार्रवाई की गई।