"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:15 IST2025-11-14T13:15:32+5:302025-11-14T13:15:54+5:30
बिहार निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस आणि त्यांची आघाडी आपटताना दिसत असताना आणि दुसऱ्या बाजूला भाजपा आणि त्यांची आघाडी पुन्हा एकदा सत्तेच्या दिशेने वाटचाल करत असतानाच काँग्रेसची ही प्रतिक्रिया आली आहे...

"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
बिहार विधानसभा निवडणूक 2025 चा निकाल येत आहेत. आतापर्यंतच्या मतमोजणीत महाआघाडीचा दारून पराभव होताना दिसत आहे. तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीवर दिसत आहे. दरम्यान, आता राजकीय वातावरणही तापायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या या स्थितीसाठी निवडणूक आयोग आणि एसआयआरला जबाबदार धरले आहे. तसेच आपला रोष व्यक्त करत, थेट निवडणूक आयोगावरच संताप व्यक्त केला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका -
काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी शुक्रवारी एएनआयशी बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका केली. ही निवडणूक ज्ञानेश कुमार आणि बिहारची जनता, यांच्यातील थेट लढत बनली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर व्यगात्मक टिप्पणी करत या लढतीत त्यांची आघाडी बिहारच्या जनतेवर भारी पडत आहे.
मी बिहारच्या जनतेला कमी समजत नाही, त्यांनी... -
निकालासंदर्भात बोलताना ते म्हणाले, "हे सुरुवातीचे निकाल आहेत. आम्ही थोडी प्रतीक्षा करत आहोत. ज्ञानेश कुमार बिहारच्या जनतेपेच्या तुलनेत आघाडीवर आहेत. मी बिहारच्या जनतेला कमी समजत नाही. त्यांनी एसआयआर आणि मतचोरी सारखे अडथे असतानाही सामना केला. हा सामना थेट बिहारची जनता आणि भारताच्या निवडणूक आयोगादरम्यान आहे. आता बघू कोण जिंकते?
महत्वाचे म्हणजे, बिहार निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस आणि त्यांची आघाडी आपटताना दिसत असताना आणि दुसऱ्या बाजूला भाजपा आणि त्यांची आघाडी पुन्हा एकदा सत्तेच्या दिशेने वाटचाल करत असतानाच काँग्रेस नेते खेडा यांची ही प्रतिक्रिया आली आहे.