शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

काँग्रेसनं PMNRF चा पैसा राजीव गांधी फाऊंडेशनमध्ये वळवला; भाजपा अध्यक्षांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 10:57 AM

शाही घराण्यानं देशाच्या जनतेचा पैसा परस्पर वळवला, त्यांनी देशाची माफी मागावी; भाजपा अध्यक्षांची मागणी

नवी दिल्‍ली: काँग्रेसनं पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतील (PMNRF)  रक्कम राजीव गांधी फाऊंडेशनकडे (RGF) वळवल्याचा आरोप भाजपाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी केला आहे. नड्डा यांनी थेट काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींवर निशाणा साधला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात PMNRF मध्ये जमा झालेला निधी राजीव गांधी फाऊंडेशनमध्ये वळवण्यात आला. PMNRF च्या बोर्डवर कोण होतं? श्रीमती सोनिया गांधी होत्या. राजीव गांधी फाऊंडेशनच्या चेअरमन कोण आहेत? सोनिया गांधीच आहेत. त्यांनी नैतिकता खुंटीवर टांगली आणि पारदर्शकतेचा तर विचारही केला नाही, अशा शब्दांत नड्डा यांनी सोनिया गांधींवर हल्लाबोल केला.देशाची लूट केल्याबद्दल शाही घराण्यानं देशाची माफी मागावी, अशी मागणी नड्डा यांनी केली. 'लोकांनी त्यांच्या कष्टाचा पैसा देशवासीयांच्या कामी यावा या हेतूनं PMNRF मध्ये जमा केला. मात्र हा पैसा एका कुटुंबाच्या फाऊंडेशनमध्ये वळता करण्यात आला. हा देशातील जनतेसोबत करण्यात आलेला विश्वासघात आहे. एका कुटुंबाच्या लालसेपोटी देशाचं नुकसान झालं. काँग्रेसच्या शाही घराण्यानं त्यांच्या वैयक्तीक स्वार्थासाठी लूट केली. याबद्दल त्यांनी देशाची माफी मागावी,' अशी मागणी भाजपा अध्यक्षांनी केली.PMNRF म्हणजे काय? पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी पूर्णपणे जनतेच्या पैशांवर चालतो. त्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नसते. देशाची जनता यामध्ये दान करते. त्यावर कोणताही कर लागत नाही. पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतील रक्कम आपत्ती काळात गरजूंसाठी वापरली जाते. राजीव गांधी फाऊंडेशन नेमकं काय करते?माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावानं १९९१ मध्ये फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. या फाऊंडेशनच्या बोर्डवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचा समावेश आहे. आरोग्य, साक्षरता, विज्ञान, संशोधन, महिला आणि बाल कल्याण यासाठी फाऊंडेशनच्या काम करत असल्याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRajiv Gandhiराजीव गांधीRahul Gandhiराहुल गांधीManmohan Singhमनमोहन सिंगP. Chidambaramपी. चिदंबरम