शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

देश बेरोजगारीच्या ‘टाइम बॉम्ब’वर, काँग्रेसची टीका, रोजगाराबाबत पक्षाकडे ठोस योजना असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 9:16 AM

प्रियांका गांधी यांनी म्हटले की, भारतातील कामगारांपैकी ८३% बेरोजगार तरुण आहेत.

नवी दिल्ली : भारतातील रोजगार परिस्थितीशी संबंधित आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (आयएलओ) आणि मानव विकास संस्थेच्या (आयएचडी) अहवालावरून काँग्रेसने देश बेरोजगारीच्या ‘टाइम बॉम्ब’वर बसला आहे, अशी टीका केंद्र सरकारवर केली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, जयराम रमेश आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी या अहवालाचा उल्लेख करताना काँग्रेसकडे रोजगाराबाबत ठोस योजना असल्याचेही सांगितले.

“आमच्या तरुणांना केंद्र सरकारच्या दयनीय उदासीनतेचा फटका सहन करावा लागत आहे, कारण सतत वाढत्या बेरोजगारीने त्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे,” असे खरगे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट केले. “आम्ही बेरोजगारीच्या ‘टाइम बॉम्ब’वर बसलो आहोत. २०१२ च्या तुलनेत केंद्र सरकारच्या काळात तरुणांची बेरोजगारी तिपटीने वाढली असून, काँग्रेसने ‘युवा न्याय’ आणला आहे,” असे खरगे म्हणाले.

प्रियांका गांधी यांनी म्हटले की, भारतातील कामगारांपैकी ८३% बेरोजगार तरुण आहेत. २००० मध्ये एकूण बेरोजगारांमध्ये सुशिक्षित तरुणांचा वाटा ३५.२ टक्के होता. २०२२ मध्ये तो ६५.७ टक्क्यांपर्यंत वाढला, म्हणजे दुप्पट झाला. दुसरीकडे पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार ‘सरकार बेरोजगारीची समस्या सोडवू शकत नाही’ असे म्हणत आहेत.

‘प्लॅन बी’अंतर्गत भाजपची जनार्दन रेड्डींसोबत भागीदारी कर्नाटकचे माजी मंत्री व खाण उद्योगपती जी. जनार्दन रेड्डींची भाजपमध्ये घरवापसी झाल्यानंतर काँग्रेसने बुधवारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. निवडणूक रोखे सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर घोषित केल्यांनतर भाजपने ‘प्लॅन बी’अंतर्गत खाण व्यावसायिकांशी थेट भागीदारी केल्याचा काँग्रेसने आरोप केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सीबीआय जनार्दन रेड्डी यांना अशी क्लीन चीट देईल की, त्यांच्यासमोर सर्व पांढरेपणा फिका पडेल, असे काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी भाजपला टोला लगावताना उपरोधिकपणे सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४