नरेंद्र मोदी तुघलक, तर योगी आदित्यनाथ औरंगजेब, काँग्रेसची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 16:41 IST2018-12-07T16:40:27+5:302018-12-07T16:41:31+5:30
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड टीका करत आहेत.

नरेंद्र मोदी तुघलक, तर योगी आदित्यनाथ औरंगजेब, काँग्रेसची बोचरी टीका
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड टीका करत आहेत. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर बोचरी टीका करताना नरेंद्र मोदींची तुघलकाशी तर योगी आदित्यनाथांची औरंगजेबाशी केली आहे.
नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना रणदीप सुरजेवाला म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोहम्मद बिन तुघलकाप्रमाणे व्यवहार करत आहेत. तर अजय सिंह बिष्ट (योगी आदित्यनाथ) औरंगजेबासह व्यवहार करत आहेत. आता देशात तालिबानी व्यवस्था चालेल की लोकशाही?''
Randeep Surjewala, Congress: Modi ji Muhammad bin Tughluq ki tarah vyavahar karte hain aur Ajay Singh Bisht (Yogi Adityanath) Aurangzeb ki tarah. Iss desh mein Talibani vyavastha chalegi ya prajatantra chalega? pic.twitter.com/JJzSOF5LoC
— ANI (@ANI) December 7, 2018