कर्नाटकात काँग्रेसचे संकट टळले? डीके शिवकुमार यांनी दिले संकेत, म्हणाले, "मला घाई नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 11:40 IST2025-11-28T11:16:18+5:302025-11-28T11:40:06+5:30
कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. मागील काही दिवसांपासून डीके शिवकुमार यांच्या बाजूच्या आमदारांनी दिल्ली दौरे वाढवले आहेत.

कर्नाटकात काँग्रेसचे संकट टळले? डीके शिवकुमार यांनी दिले संकेत, म्हणाले, "मला घाई नाही..."
कर्नाटकात मुख्यमंत्रीपदावरून संघर्ष सुरू आहे. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यात अंतर्गत वाद सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपदाबद्दल वाढत्या अटकळांमध्ये, डी.के. शिवकुमार यांनी गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बदलण्याबाबत कोणतीही चर्चा झाल्याचे नाकारले. मुख्यमंत्रीपद बदलावर आम्हाला कोणतीही घाई नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यांच्या अलिकडच्या मुंबई दौऱ्यात ते कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना भेटले नाहीत. जर अशा कोणत्याही चर्चा झाल्या तर त्या मुंबईमध्ये नव्हे तर बंगळुरू किंवा दिल्लीत होतील, असंही त्यांनी सांगितले.
नेतृत्व बदलाच्या चर्चा २०२३ च्या कथित "सत्ता-वाटप करार" मध्ये आहे, यामध्ये सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद ठेवण्याचे मान्य केले.
शिवकुमार यांनी वारंवार या चर्चेचा उल्लेख केला आहे, पण याबाबतची चर्चा पक्षाने उघडपणे केलेली नाही. डीके शिवकुमार यांच्या गटातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, डीके शिवकुमार, मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला आणि डी.के. सुरेश यांच्यातील चर्चेनंतर १८ मे २०२३ रोजी हा फॉर्म्युला अंतिम करण्यात आला होता. सुरुवातीला सिद्धरामय्या हणाले होते की ते पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील. २२ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा खरगे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर त्यांची भूमिका मागे पडल्याची दिसत आहे. ते म्हणाले, "सत्ता-वाटपाच्या मुद्द्यावर हायकमांड निर्णय घेईल."
मागील काही दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये नाराजी दिसत आहे. काही दिवसांपूर्वी डीके शिवकुमार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. "शब्द पाळणे ही सर्वात मोठी शक्ती आहे" आणि "शब्दशक्ती ही जागतिक शक्ती आहे, असे त्यांनी या पोस्ट म्हटले होते. पक्षाच्या उच्च कमांडला हा एक संकेत म्हणून या पोस्टचे अनेकांनी अर्थ लावले.