शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

आता काँग्रेसमध्ये 'एक व्यक्ती एक पद'?; सोनिया गांधी मोठा निर्णय घेण्याच्या विचारात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 1:28 PM

हंगामी अध्यक्षपद स्वीकारताच सोनिया गांधी ऍक्शन मोडमध्ये

नवी दिल्ली: काँग्रेसमध्ये लवकरच एक व्यक्ती, एक पद सूत्राची अंमलबजावणी केली जाऊ शकते. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी सध्या रणनितीकारांसोबत याविषयी चर्चा करत आहेत. याबद्दलचा निर्णय सोनिया गांधी लवकरच घेऊ शकतात. सध्या काँग्रेसमधील ६ मोठे नेते दोन-दोन पदांवर आहेत. या नेत्यांशी सल्लामसलत करुन सोनिया गांधी निर्णय घेतील, असं वृत्त 'आज तक'नं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. स्वत: सोनिया गांधींकडे दोन पदं आहेत. काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदासह त्या पक्षाच्या संसदीय दलाच्या नेत्यादेखील आहेत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्ष पदावरील सोनिया गांधी पक्ष संघटनेच्या प्रमुख आहेत. तर संसदीय दलाच्या नेत्या म्हणून त्या संसदेत पक्षाच्या प्रमुख आहेत. त्यामुळे सोनिया गांधींकडे दोन्ही पदं कायम राहतील, असं काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितलं. कोणत्या नेत्यांकडे एकापेक्षा अधिक पदं?-गुलाम नबी आजाद, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते, राष्ट्रीय महासचिव, प्रभारी- हरियाणा-सचिन पायलट- उपमुख्यमंत्री, राजस्थान आणि प्रदेशाध्यक्ष-नाना पटोले- अध्यक्ष, किसान मजदूर काँग्रेस आणि अध्यक्ष, प्रचार समिती (महाराष्ट्र)-नितीन राऊत- अध्यक्ष, अनुसूचित जाती विभाग-काँग्रेस आणि कार्यकारी अध्यक्ष (महाराष्ट्र)-उमंग सिंगार- कॅबिनेट मंत्री, मध्य प्रदेश सरकार आणि प्रभारी सचिव-कमलनाथ, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश आणि प्रदेशाध्यक्षहंगामी अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यावर सोनिया गांधींनी काँग्रेस कार्यकारणीची बैठक घेतली. मात्र या बैठकीत नेत्यांमध्ये झालेला संवाद माध्यमांपर्यंत पोहोचला. यानंतर सोनिया गांधींनी बैठकीत मोबाईल न आणण्याचे स्पष्ट आदेश पक्षातील नेत्यांना दिले. शीला दीक्षित यांच्या निधनामुळे रिक्त झालेलं दिल्ली काँग्रेसचं अध्यक्षपद नेमकं कोणाकडे द्यायचं, असा प्रश्न सध्या सोनिया गांधींसमोर आहे. याशिवाय झारखंड, हरियाणा, महाराष्ट्रात पक्षाला सक्षम करण्याच्या आव्हानाच्या सामनादेखील त्यांना करावा लागणार आहे.  

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले