शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या 'या' फोटोनं वाढवली भाजपाची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 14:44 IST

विरोधकांचा 'प्रवास' मोदी आणि भाजपासाठी अडथळा ठरण्याची शक्यता 

जयपूर: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचं मनोधैर्य उंचावलं आहे. यामुळे 2019 मध्ये भाजपाविरोधात महाआघाडी करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आज तीन राज्यांमध्ये काँग्रेस नेत्यांचा शपथविधी आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व नेत्यांनी राहुल गांधींसह एकाच बसनं प्रवास केला. विरोधकांचा हा 'प्रवास' भाजपासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील भाजपाला रोखण्यासाठी विरोधी पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महाआघाडी तयार करण्याचा विरोधकांचा मानस आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसनं जेडीएसच्या मदतीनं सत्ता स्थापन करत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं. तेव्हापासून महाआघाडी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. आज तीन राज्यांमध्ये काँग्रेस नेते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. या कार्यक्रमांना विरोधी पक्षातील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत.राहुल गांधी सकाळी जयपूरला पोहोचले. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी एकाच बसनं प्रवास केला. यामध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, एलजेडीचे नेते शरद यादव, डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश केला. विरोधकांच्या या वाढत्या जवळिकीमुळे भाजपाच्या चिंतेत भर पडणार आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीChief Ministerमुख्यमंत्रीAshok Gahlotअशोक गहलोतSharad Pawarशरद पवारManmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस