पूर्वांचल मतदारांवर काँग्रेस-भाजपची मदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 06:30 IST2025-01-25T06:29:37+5:302025-01-25T06:30:10+5:30

Delhi Election 2025: राजधानी क्षेत्रात विधानसभा निवडणुकीत मूळ पूर्वांचलच्या असलेल्या मतदारांवर काँग्रेस व भाजपचे लक्ष असून काँग्रेसने या लोकांसाठी वेगळे मंत्रालय स्थापन करण्याचे आश्वासन प्रचारात दिले आहे.

Congress-BJP's influence on Purvanchal voters | पूर्वांचल मतदारांवर काँग्रेस-भाजपची मदार

पूर्वांचल मतदारांवर काँग्रेस-भाजपची मदार

- चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली - राजधानी क्षेत्रात विधानसभा निवडणुकीत मूळ पूर्वांचलच्या असलेल्या मतदारांवर काँग्रेस व भाजपचे लक्ष असून काँग्रेसने या लोकांसाठी वेगळे मंत्रालय स्थापन करण्याचे आश्वासन प्रचारात दिले आहे. आरोग्य, शिक्षणासह विविध क्षेत्रात या लोकांच्या विकासासाठी योजना राबवण्याचे आश्वासन या पक्षाने दिले आहे. तर, भाजपसाठीही सुमारे ४० मतदारसंघांत दबदबा असलेला पूर्वांचलचा मतदारच प्रमुख लक्ष्य असून या पक्षाने उत्तर-प्रदेश, बिहारमधील १०० नेते यासाठी मैदानात उतरवले आहेत.
दिल्लीच्या विविध भागांत बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमधून आलेल्या पूर्वांचली लोकांच्या वस्त्या तयार झाल्या आहेत. हा मतदार निवडणुकीत अपेक्षेनुसार वाटा न मिळाल्यामुळे भाजपवर नाराज आहे.

Web Title: Congress-BJP's influence on Purvanchal voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.