दलितांच्या हक्कांसाठी राहुल गांधींचे राजघाटावर आज उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 08:29 IST2018-04-09T08:29:42+5:302018-04-09T08:29:42+5:30

दलितांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि मोदी सरकारच्या दडपशाहीविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे.

Congres President Rahul Gandhi to observe hunger strike for Dalit rights today | दलितांच्या हक्कांसाठी राहुल गांधींचे राजघाटावर आज उपोषण

दलितांच्या हक्कांसाठी राहुल गांधींचे राजघाटावर आज उपोषण

नवी दिल्ली: देशातील जातीय सलोखा व सामाजिक ऐक्य जपण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे सोमवारी करण्यात येणाऱ्या लाक्षणिक उपोषणात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सहभागी होणार आहेत. सकाळी साधारण 10 वाजता ते राजघाटावर उपोषणाला बसतील. दलितांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि मोदी सरकारच्या दडपशाहीविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे.
 
त्यास पाठिंबा देण्यासाठी देशभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेतेही आपापल्या भागात उपोषण करतील. महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण परभणी येथे उपोषणाला बसणार आहेत. मुंबईत सकाळी १० वाजेपासून अमर जवान ज्योत जवळ पक्षातर्फे सामूहिक उपवास कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली आहे.
 

Web Title: Congres President Rahul Gandhi to observe hunger strike for Dalit rights today