शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी संघटनांमध्ये युुवकांच्या भरतीने चिंता

By admin | Updated: June 7, 2015 23:22 IST

हिजबुल मुजाहिदीनमध्ये नव्याने सुरू झालेली युवकांची भरती यामुळे सुरक्षा प्रतिष्ठानांमध्ये धोक्याची घंटा वाजू लागली आहे.

श्रीनगर/नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरातील दूरसंचार मनोऱ्यांवर वारंवार होणारे हल्ले आणि दक्षिण काश्मिरातील दहशतवादी संघटनांमध्ये, विशेषत: हिजबुल मुजाहिदीनमध्ये नव्याने सुरू झालेली युवकांची भरती यामुळे सुरक्षा प्रतिष्ठानांमध्ये धोक्याची घंटा वाजू लागली आहे.२६ युवक, मुख्यत्वे दक्षिण काश्मिरातील युवक दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले आहेत, असे काश्मीर खोऱ्यात मागील तीन महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांवरून दिसून येते. दूरसंचार मनोऱ्यांवर अलीकडच्या काळात झालेले दहशतवादी हल्ले हा पाकिस्तानमधील हिजबुल मुजाहिदीनमधील अंतर्गत कलहाचा परिणाम असू शकतो, असे अधिकृत सूत्रांनी म्हटले आहे.तथापि हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याने या दूरसंचार मनोऱ्यांवरील हल्ल्यात आपल्या संघटनेचा हात असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. परंतु लष्कर-ए-इस्लाम ही हिजबुल मुजाहिदीनचीच एक शाखा आहे आणि त्याचा स्वयंघोषित कमांडर कयूम नजरवाला याने हे हल्ले घडवून आणल्याची माहिती सूत्रांनी दिली. कयूम हा सोपोरचा रहाणारा असून, तो मागील सहा वर्षांपासून या संघटनेचे नेतृत्व करीत आहे. हिजबुल मुजाहिदीनने एका खासगी दूरसंचार कंपनीच्या दोन मोबाईल मनोऱ्यांवर रिपिटर बसविले होते आणि त्याचा वापर तो आपल्या संघटनेमार्फ संदेश पाठविण्यासाठी करीत होता, असे तपासात आढळून आले आहे. यांपैकी एक रिपिटर सुरक्षा दलांच्या जवानांनी जप्त केले होते. त्यामुळे दहशतवादी संघटना प्रक्षुब्ध झाल्या आणि त्यांनी मनोरा उभारण्यात आलेल्या जमीन मालकाला धमक्या दिल्या. त्यानंतरच संपूर्ण सोपोर जिल्ह्णात दूरसंचार/मोबाईल मनोरे उडविण्याची धमकी देणारे पोस्टर्स लावण्यात आले होते. २३ मे आणि १ जून या दरम्यान सहा मनोऱ्यांवर दहशतवादी हल्ले करण्यात आले आणि त्यात दोन जण ठार व चार जखमी झाले.या संदर्भात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. परंतु एकानेही या हल्ल्याबाबतची माहिती दिलेली नाही. हिजबुल मुजाहिदीनची शाखा असलेल्या लष्कर-ए-इस्लामने दक्षिण आणि उत्तर काश्मिरातून २६ युवकांची भरती केल्याचे वृत्त आहे. या युवकांना अद्याप पाकव्याप्त काश्मिरात दहशतवादी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आलेले नसले तरी त्यांना दक्षिण काश्मीरच्या पर्वतीय भागात आणि त्राल व उत्तर काश्मीरच्या जंगलात ग्रेनेड फेकणे, गोळीबार करणे आणि अन्य शस्त्रांचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. श्रीनगर येथे दूरसंचार आॅपरेटर्सवरील हल्ला आणि गेल्या महिन्यात दक्षिण काश्मिरातील सीआरपीएफ जवानाच्या हत्येसाठी हे नव्याने भरती झालेले युवकच जबाबदार असल्याचे समजते. (वृत्तसंस्था)