मोरारी बापू यांच्या विरोधात मुझफ्फरपूर न्यायालयात तक्रार, करण्यात आला 'असा' आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 21:17 IST2020-06-07T21:08:09+5:302020-06-07T21:17:26+5:30
मुझफ्फरपूर : कथावाचक मोरारी बापू यांच्या विरोधात बिहारमधील मुझफ्फरपूर न्यायालयात शनिवारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मीनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ...

मोरारी बापू यांच्या विरोधात मुझफ्फरपूर न्यायालयात तक्रार, करण्यात आला 'असा' आरोप
मुझफ्फरपूर : कथावाचक मोरारी बापू यांच्या विरोधात बिहारमधील मुझफ्फरपूर न्यायालयात शनिवारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मीनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुर्की खरारू गावचे रहिवासी, तसेच अखिल भारतवर्षीय यादव महासभेचे मुझफ्फरपूर अध्यक्ष जवाहरलाल राय यांनी ही तक्रार दाखल केली.
मुख्य न्यायदंडाधिकारी मुकेश कुमार यांनी ही तक्रार सुनावणीसाठी ठेवली आहे. या तक्रारीत म्हणण्यात आले आहे की, पाच जूनला मोबाईल फेसबूकवर मोरारी बापू यांच्या प्रवचनाचा एक व्हिडिओ पाहिला. यात, भगवान श्रीकृष्ण यांची मुले आणि नातवांच्या चरित्राबद्दल बापू आक्षेपार्ह कथा सांगत होते. यामुळे आपली भावना दुखावली आहे.
हेही वाचा -
श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये 37 वेळा हालला पाळणा; कुणी करुणा, तर कुणी लॉकडाउन ठेवलं नाव
"लाल बहादुर शास्त्रीजींनंतर मी नरेंद्र मोदींसारखा नेता पाहिला नाही"
CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...
आता या 'स्वस्त' औषधाने होणार कोरोनाचा 'मस्त' इलाज? गोळीची किंमत फक्त 1 रुपया