शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारकर्ताच फितूर : टोल नाका लूट प्रकरण

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

फिर्यादीच फितूर : टोल नाका

फिर्यादीच फितूर : टोल नाका
लुटीतील आरोपी निर्दोष

आरोपींमध्ये माजी नगरसेवक

नागपूर : वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोल नाका लूट प्रकरणी खुद्द फिर्यादीच फितूर झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश वसंत कुळकर्णी यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी संशयाचा लाभ देत सर्व चारही आरोपींची निर्दोष सुटका केली.
माजी नगरसेवक राजू माटे रा. सुरेंद्रनगर, अनिल ऊर्फ अण्णा राऊत रा. बिडीपेठ, राजू जंगले रा. वाडी आणि आशिष झा रा. अजनी, अशी आरोपींची नावे आहेत.
सरकार पक्षानुसार या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी, ११ जानेवारी २०१३ रोजी अण्णा राऊत आणि राजू माटे यांनी वाडी आणि दाभा भागातील टोल नाक्यांवर खंडणी वसुलीसाठी पाठविले होते. टोल नाका संचालकाने खंडणी देण्यास नकार देताच आरोपींनी लुटलूट केली होती. एकूण ८५ हजाराची रक्कम त्यांनी लुटली होती.
फिर्यादी राजेंद्र सुभाष देशमुख यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी भादंविच्या ३९२, ३९७, ३४, १०९ कलमान्वये गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक केली होती. उपनिरीक्षक दहातोंडे यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले होते. खुद्द फिर्यादी आणि अन्य तीन साक्षीदार फितूर झाले होते. त्यामुळे सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. न्यायालयात आरोपींच्या वतीने ॲड. राम मासुरके, ॲड. पराग उके तर सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील वसंत नरसापूरकर यांनी काम पाहिले.