शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित जमीनसंदर्भात आयुक्तांनीच निर्णय घ्यावा

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

स्थायी समितीचा फटकार : टाऊ न हॉल जमिनीची फाईल परत नागपूर : तिजोरीवर क ोणताही आर्थिक भार न पडता महापालिकेला जमीन उपलब्ध होणार होती. परंतु प्रशासनाच्या चुकीमुळे यासाठी ११.२३ कोटींचा खर्च करण्याचा विचार होता. आता याच जमिनीच्या वापरात बदल करून तो टाऊ न हॉल ऐवजी ...


स्थायी समितीचा फटकार : टाऊ न हॉल जमिनीची फाईल परत
नागपूर : तिजोरीवर क ोणताही आर्थिक भार न पडता महापालिकेला जमीन उपलब्ध होणार होती. परंतु प्रशासनाच्या चुकीमुळे यासाठी ११.२३ कोटींचा खर्च करण्याचा विचार होता. आता याच जमिनीच्या वापरात बदल करून तो टाऊ न हॉल ऐवजी निवास करावा, अशा आशयाचा प्रस्ताव शुक्र वारी मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. परंतु सदस्यांनी यावर आक्षेप घेतल्याने निर्णयासाठी हा प्रस्ताव आयुक्तांकडे परत पाठविण्यात आला.
जरीपटका येथील ६१४४ चौ.मीटर जमीन टाऊ न हॉलसाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. परंतु मनपाच्या अधिकाऱ्यांनी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा केला नाही. त्यामुळे या जागेच्या अर्ध्या भागात लोकांनी अतिक्रमण करून घरे उभारली. या संदर्भात कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला. परंतु मार्ग निघाला नाही. आता उर्वरित ३६२०.५० चौ.मी. जमीन मनपाला अधिग्रहित करावयाची असल्यास यासाठी ११.२३ कोटी खर्च करावे लागतील. आर्थिक स्थिती बिकट असल्याने रकमेचा भरणा केला नाही तर मनपाला या जागेवर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांचा शोध घेऊ न त्यांचेवर कारवाई करण्याचे निर्देश समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी दिले.(प्रतिनिधी)
चौकट..
२९३ नव्हे १३१ फुटांचा तिरंगा!
देशातील सर्वात उंच तिरंगा झेंडा नागपुरात उभारण्याची घोषणा बाल्या बोरकर यांनी अर्थसंकल्पात केली होती. परंतु विमानतळ प्राधिकरणकडून याला मंजुरी न मिळाल्याने झेंड्याची उंची २९३ वरून १३१ फूट करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी ४ हजार चौ.फूट जागेची गरज आहे. बॉटनिकल गार्डन वा अंबाझरी तलाव यापैकी एका जागेची निवड केली जाणार आहे. या प्रकल्पावर १.३० कोटीचा खर्च अपेक्षित असून यासाठी जगताप ॲन्ड असोसिएट कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
चौकट...
घाटांवर शवदाहिनी लागणार
सहकारनगर व मानेवाडा घाटावर गॅसवर चालणारी शवदाहिनी लावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यासाठी लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत. सोबतच घाटावरील हॉल व विविध विकास कामे केली जातील. तसेच मोक्षधाम घाटावर ३० मीटर उंचीची चिमणी लावण्यात येणार आहे. यावर २७ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. घाटावरील सुविधाकडे विशेष लक्ष देत असल्याची माहिती बोरकर यांनी दिली.