सुरक्षेसाठी घेतला मंदिराचा आसरा, तिघांनी केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 17:03 IST2018-02-06T17:03:00+5:302018-02-06T17:03:25+5:30

23 वर्षीय मुलगी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी जात होती.

College girl gang-raped in temple | सुरक्षेसाठी घेतला मंदिराचा आसरा, तिघांनी केला बलात्कार

सुरक्षेसाठी घेतला मंदिराचा आसरा, तिघांनी केला बलात्कार

नवी दिल्ली - एका 23 वर्षीय मुलीवर मंदिरात सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  काल (सोमवारी) सकाळी एका 23 वर्षीय मुलीवर मंदीरात तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. मुलीच्या चपळाईमुळं एका तासाच्या पोलिसांनी त्या आरोपीनां गजाआड केलं. 

स्थानिक पोलिस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय मुलगी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी जात होती. त्यावेळी बसमधून उतरुन ती मंदिराच्या जवळ असलेल्या एका मोठ्या दगडाजवळ उभी राहिली होती. त्यावेळी तीला एकटीला पाहून एका मुलानं तिला विचारलं इथं का उभे आहात. सुरक्षेसाठी मंदिरात या. त्यानंतर ती मंदिरात गेली. 23 वर्षीय मुलीनं मंदिरात प्रवेश करताच त्या व्यक्तीसह अन्य दोघांनी मंदिराचे मुख्य गेट बंद केलं. त्यानंतर तिच्यावर तिघानी तिच्यावर बलात्कार केला. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 23 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिघेही आरोपी फरार झाले . मुलीनं आपल्या प्रियकराला कॉल केला तर त्याचा फोन बंद होता. त्यानंतर त्यामुलीनं आपल्या एका मैत्रीणीला फोन केला आणि झालेली सर्व घटना सांगितली. त्यानंतर तिच्या मैत्रीणीनं पोलिसांना झालेली घटना सांगितली.

बलात्काराच्या या दुर्देवी घटनेनंतरी मुलीनं साहस दाखवलं. त्या आरोपीपैकी एकाच्या दुचाकीवर 'संजू बाबा' असे लिहले तिनं पाहिले. पोलिसांना त्या तिघांचा चेहरा कसा होता. हे सांगताना तने दुचाकीबद्दलही सांगितले. त्यानंतर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांचा शोध सुरु केला. त्यांनी बाईकला ट्रॅक करत 30 वर्षीय संजय पटेलला अटक केली. पोलिसांनी त्याला रिमांडवर घेतल्यानंतर त्यानं गुन्हा कबुल केला. 

आरोपी संजयनं पोलिसांना सांगितले की, 25 वर्षीय अखिलेश पटेल आणि 45 वर्षीय महादेव पाटीदार यांच्यासोबत आम्ही मुलीवर अतिप्रसंग केला. त्याच्या या माहितीनंतर पोलिसांनी त्या दोघानाही अटक केली. 

Web Title: College girl gang-raped in temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.