थंडीची लाट; सिमला, मनालीत बर्फवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 06:11 AM2020-01-05T06:11:13+5:302020-01-05T06:11:23+5:30

शनिवारी अनेक ठिकाणी बर्फवृष्टी झाल्याने हिमाचल प्रदेशसह पंजाब व हरियाणा या राज्यांतील थंडीची लाट आणखी तीव्र झाली.

Cold wave Simla, snowfall in Manali | थंडीची लाट; सिमला, मनालीत बर्फवृष्टी

थंडीची लाट; सिमला, मनालीत बर्फवृष्टी

Next

सिमला/चंदीगड : शनिवारी अनेक ठिकाणी बर्फवृष्टी झाल्याने हिमाचल प्रदेशसह पंजाब व हरियाणा या राज्यांतील थंडीची लाट आणखी तीव्र झाली. काश्मिरात तुरळक ठिकाणी हलकी बर्फवृष्टी झाली असतानाच किमान तापमान वाढल्याने थंडीची लाट थोडीशी कमी झाली आहे.
हिमाचल प्रदेशातील सिमला आणि मनाली येथे या वर्षातील पहिली बर्फवृष्टी झाली. त्यामुळे संपूर्ण हिमाचल प्रदेश गारठले आहे. बर्फवृष्टीमुळे पर्यटक आणि हॉटेल व्यावसायिक आनंदले आहेत. हवामान खात्याने पिवळा इशारा जारी केला आहे. पिवळा इशारा किमान धोक्याचा संकेत
देतो. राज्यातील बहुतांश पर्यटन स्थळांवरील तापमान शून्याखाली आहे. सिमला, काल्पा, मनाली, डलहौसी, केलाँग यांचा त्यात समावेश आहे. केलाँग येथे सर्वाधिक कमी उणे १0.५ अंश तापमान राहिले. काल्पा येथे उणे ३ अंश, मनाली येथे उणे १.२ अंश, तर डलहौसी येथे उणे 0.६ अंश तापमान राहिले.
पंजाब आणि हरियाणातही थंडीची तीव्र लाट असून, ३.६ अंश तापमानासह फरीदकोट हे दोन्ही राज्यांतील सर्वाधिक थंड ठिकाण ठरले आहे. पंजाबातील पतियाळा, अमृतसर, लुधियाना, हलवारा, भटिंडा आणि आदमपूर येथील तापमान ५ अंशांच्या खाली आहे. पठाणकोटमध्ये ६.८ अंश, तर गुरुदासपूरमध्ये ५.५ अंश तापमान राहिले. हरियाणातील कर्नाल आणि अंबाला येथे पारा अनुक्रमे ६.८ आणि ४.५ अंश राहिला. हिसार येथील तापमान ३.८ अंश राहिले. भिवानी, रोहतक, नारनौल, सिरसा ही शहरेही गारठली आहेत. दोन्ही राज्यांची राजधानी असलेल्या चंदीगढमध्ये ६.७ अंश तापमानाची नोंद झाली. अंबाला, कर्नाल, भिवानी, अमृतसर आणि लुधियाना येथे धुके पसरले आहे. काश्मीर खोरे, जम्मू आणि लदाख भागात अनेक ठिकाणी शनिवारी दोन ते पाच इंच बर्फवृष्टी झाली. अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या.
>विमान कोसळले; मुंबईच्या दोन पायलटचा मृत्यू
मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री धुक्यामुळे एक विमान कोसळून दोन पायलटचा मृत्यू झाला. पायलट अशोक मकवाना (५८) आणि पीयूष चंदेल (३०) अशी मृत पायलटसची नावे आहेत. दोघेही मुंबईचे रहिवासी होते. सागरपासून १४ किमीवर हा अपघात झाला. धुक्यामुळे पायलटला रनवेचा अंदाज आला नाही आणि विमान चुकीच्या जागी लँड झाले, असा अंदाज आहे.

Web Title: Cold wave Simla, snowfall in Manali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.