शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

फेक ट्रेनरमुळे मॉक ड्रिल प्रशिक्षण विद्यार्थिनीच्या बेतले जीवावर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 19:01 IST

तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये आपातकालीन परिस्थितीत कसं बाहेर पडावं याचं प्रात्यक्षिक देत असताना एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोईम्बतूर - तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये आपातकालीन परिस्थितीत कसं बाहेर पडावं याचं प्रात्यक्षिक देत असताना एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोगेश्वरी असं या मुलीचं नाव असून ती कालाईमंगल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये बीबीएच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. मॉक ड्रिलदरम्यान लोगेश्वरी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारण्यास तयार नव्हती. मात्र  ट्रेनरने जबरदस्तीने तिला खाली ढकललं यावेळी छताला डोकं आपटून तिचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. लोगेश्वरीला ढकलणारा ट्रेनर हा फेक असल्याचा माहिती आता समोर आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (12 जुलै ) कॉलेजमध्ये आपातकालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना बाहेर कसं पडायचं याचे धडे दिले जात होते. यामध्ये विद्यार्थ्यांना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारण्याचं प्रशिक्षण ट्रेनर देत होते. तसेच उडी मारणाऱ्या मुलांना झेलायला जाळी पकडून काही विद्यार्थीही खाली उभे होते. मात्र लोगेश्वरी उडी मारण्यासाठी तयार नव्हती. ती घाबरत असल्याचं पाहून ट्रेनर अरुमुगनने तिला मागून धक्का दिला आणि ती खाली कोसळली. याप्रकरणाची अधिक चौकशी केली असता अरुमुगन हा फेक ट्रेनर असल्याची बाब समोर आली आहे. कॉलेज प्रशासनानेही हे प्रात्यक्षिक आमचं नसून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आयोजित केल्याचा दावा केला आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये लोगेश्वरीच्या डोक्याला यामध्ये गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी लोगेश्वरीला तातडीने एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र खासगी रुग्णालयाने तिच्यावर उपचार करण्यास नकार दिल्याने तिला सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अरुमुगनला अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूDeathमृत्यू