शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Coal supply shortage in india : कोळसा संकटावरून मिनिष सिसोदियांचा BJP वर निशाणा; म्हणाले, "देश चालवला जात नाही, ऑक्सिजन संकटही मानलं नव्हतं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 07:49 IST

Manish Sisodia On Coal Shortage : काही महिन्यांपूर्वी जेव्हा ऑक्सिजन संकट निर्माण झालं होतं तेव्हाही केंद्रानं मानलं नव्हतं. अनेक राज्यांनी त्यावेळी विनंती केली होती, सिसोदिया यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देऑक्सिजन संकट निर्माण झालं होतं तेव्हाही केंद्रानं मानलं नव्हतं, सिसोदिया यांचं वक्तव्य.

Coal supply shortage in india : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Delhi Deputy CM Manish Sisodia) यांनी दिल्लीतीलवीज प्रकल्पांमध्ये निर्माण झालेल्या कोळशाच्या संकटावरून भाजपावर निशाणा साधला. दिल्लीत जर २४ तासांचाच कोळसा शिल्लक राहिला तर आम्हाला भारनियमन (Load Shadding) करावं लागेल असं विधान केलं. तसंच अनेक वीज प्रकल्पांमध्ये कोळशाची कमतरता आहे आणि काही वीज प्रकल्प यामुळे बंदही झाल्याचे ते म्हणाले. आता कोळसा समस्येवरून राजकारणालाही सुरूवात झाली आहे. मनिष सिसोदिया यांनी कोळसा संकटाच्या शक्यतेवरून वरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपकडून आता देश चालवला जात नाही आणि ते आता या संकटापासून पळ काढण्याचा मार्ग शोधत आहेत, असं सिसोदिया म्हणाले. "आम्ही ऊर्जा मंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली.

कोळशाची कोणतीही कमतरता नाही असं त्यांनी सांगितलंय ऊर्जा मंत्र्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लिहिलेल्या पत्रावरही आक्षेप घेतला. परंतु हे केंद्रीय मंत्र्यांनी बेजबाबदारपणाचं वक्तव्य आहे." असं त्यांनी नमूद केलं."अशाचप्रकारे काही महिन्यांपूर्वी देशात ऑक्सिजनचं संकट निर्माण झालं होतं. तेव्हादेखील केंद्रानं ते मानलं नव्हतं. अनेक राज्यांनी केंद्राकडे आवाहन केलं, परंतु केंद्रानं ऐकलं नाही. तेव्हा मोदी सरकार डोळे बंद  करून बसलं होतं आणि आताही ते कोळशाची कमतरता नसल्याचं सांगत आहेत," असं ते म्हणाले. 

देश चालत नाही"भाजपकडून केंद्रात सरकार चालत नाही, त्यांच्याकडून देश चालवला जात नाही आणि जबाबदारीपासून पळ काढण्याचे काम ते लोक करत आहेत. कोळशाच्या कमतरतेमुळे वीज संकट निर्माण होऊ शकतं. केंद्राकडून डोळे बदं करून बसण्याचं धोरण घातक ठरू शकतं. कोळशाचं संकट हे वीज संकटच आहे, हे देशाला खड्ड्यात घालण्याप्रमाणेच आहे," असंही ते म्हणाले. 

काँग्रेसकडूनही हल्लाबोलदेशात कोळशाच्या कमतरतेच्या शक्यतांवरून काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनीदेखील केंद्रावर निशाणा साधला. "कोळसा संपला. कोळशाची दलाली करणारे हात अंधाऱ्या रात्रींची तयारी करत आहेत. पाणी, पेट्रोल, डिझेल याप्रकारे आता वीज खरेदी करावी लागेल. जितक्या तासांसाठी वीज हवी  तेवढी विकत घ्या आणि पैसे द्या. साहेबांनी मित्रांसाठी शक्य करून दाखवलं," असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली.

टॅग्स :delhiदिल्लीelectricityवीजBJPभाजपा