६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 12:49 IST2025-08-13T12:48:53+5:302025-08-13T12:49:26+5:30
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात सर्व मंत्र्यांची उपस्थिती बंधनकारक ठेवण्यात आली आहे

६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
लखनौ - उत्तर प्रदेशविधानसभा पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. यावेळी सभागृहाचं कामकाज २४ तास सुरू राहणार आहे. सकाळी ११ वाजता सुरू झालेले सभागृह १४ ऑगस्टच्या सकाळी ११ पर्यंत सलग सुरू राहील. या काळात भाजपाकडून २८ मंत्र्यांना शिफ्टनुसार ड्युटी लावली आहे. ६ शिफ्टमध्ये या मंत्र्यांना कामाची वेळ ठरवून दिली आहे. संध्याकाळपासून संपूर्ण रात्र आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत कामकाजाचे वेळापत्रक जारी झाले आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात सर्व मंत्र्यांची उपस्थिती बंधनकारक ठेवण्यात आली आहे. २८ मंत्र्यांचे वेळापत्रक ठरले असून बुधवारी संध्याकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ११ पर्यंत हे कामकाज असेल. सकाळी ११ ते संध्याकाळी ६ पर्यंत सामान्य विषयावर चर्चा होईल. त्यात सर्व जण सहभागी होतील. त्यानंतर संध्याकाळी ६ ते गुरुवारी सकाळी ११ पर्यंत ६ शिफ्टमध्ये कामकाजाचे वाटप करण्यात आले आहे. त्यात १ शिफ्ट २ तासांची असणार आहे इतर सर्व शिफ्ट ३-३ तासांच्या असतील.
बुधवारी संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत - लक्ष्मी नारायण चौधरी, राकेश सचान, नितीन अग्रवाल, विजय लक्ष्मी गौतम
रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत - योगेंद्र उपाध्याय, कपिल देव अग्रवाल, सतीश चंद्र शर्मा
रात्री १२ ते ३ वाजेपर्यंत - अनिल कुमार, दयाशंकर सिंह, दयाशंकर मित्र दयालु, बृजेश सिंह
मध्यरात्री ३ ते पहाटे ६ वाजेपर्यंत - अनिल राजभर, गिरीश चंद्र यादव, बलदेव सिंह, दिनेश खटिक, संजीव गौंड, रामकेश निषाद, मनोहर लाल मन्नू कोरी, केपी मलिक
गुरुवारी सकाळी ६ ते ९ पर्यंत - जयवीर सिंह, नंद गोपाल गुप्ता, संदीप सिंह, रवींद्र जयस्वाल, सोमेंद्र तोमर
सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत - सूर्यप्रताप शाही, संजय सिंह निषाद, गुलाब देवी, रजनी तिवारी
काय आहे कारण?
उत्तर प्रदेशच्या पावसाळी अधिवेशनात या काळात विकसित भारत, विकसित उत्तर प्रदेश २०४७ व्हिजन डॉक्युमेंटवर विशेष चर्चा होणार आहे. जवळपास १७ ते १८ तास सलग ही चर्चा सुरू राहील. व्हिजन डॉक्युमेंटच्या माध्यमातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील सरकार राज्याच्या विकासाबाबत व्हिजन सादर करणार आहे. सरकारकडून विधानसभेत १८ तर विधान परिषदेत १८ मंत्री बोलतील. तर चौथ्या दिवशी सभागृहात व्हिजन डॉक्युमेंट्स २०४७ वर मुख्यमंत्री योगी भाष्य करणार आहेत.