कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये विकासाला सुरुवात? CM ओमर अब्दुल्ला म्हणाले, "काही संबंध नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 08:17 IST2025-01-13T08:16:22+5:302025-01-13T08:17:54+5:30

Arilce 370: जम्मू आणि काश्मीरमधील पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण होण्याचा कलम ३७० रद्द करण्याशी काहीही संबंध नसल्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

CM Omar Abdullah has said that the completion of infrastructure projects in JaK has nothing to do with the abrogation of Article 370 | कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये विकासाला सुरुवात? CM ओमर अब्दुल्ला म्हणाले, "काही संबंध नाही"

कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये विकासाला सुरुवात? CM ओमर अब्दुल्ला म्हणाले, "काही संबंध नाही"

CM Omar Abdullah : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी जम्मू-काश्मीरल दौऱ्यावर असणार आहेत. यादरम्यान ते सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन करतील. कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पायाभूत सुविधांचा विकास झपाट्याने झाल्याचा समज सामान्यांमध्ये झाला आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला. या विकासाचा संबंध कलम ३७० च्या राजकारणाशी जोडू नये, असे त्यांचे म्हणणे आहे. काश्मीर खोऱ्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्याचे कलम ३७० रद्द करण्याशी काहीही संबंध नाही, असं ओमर अब्दुला यांनी म्हटलं.

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर केंद्रशासित प्रदेशाच्या विकासाला गती मिळाल्याचा दावा केंद्र सरकार करत असल्याचा सवाल ओमर अब्दुल्ला यानी केला. तुम्ही ५ ऑगस्ट २०१९ नंतर सुरू झालेल्या प्रकल्पांबद्दल सांगितले आहे. हे सर्व मोठे इन्फ्रा प्रकल्प ५ ऑगस्ट २०१९ पूर्वीचे आणि कलम ३७० रद्द करण्याआधीचे आहेत, ज्याची कामे अजूनही सुरू आहेत, असं ओमर अब्दुल्ला म्हणाले. इंडिया टुडेशी बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी असेही सांगितले की जम्मू आणि काश्मीरमधील पायाभूत सुविधांचे प्रकल्प कलम ३७० रद्द न करताही पूर्ण होऊ शकले असते

"हे प्रकल्प केव्हा ना केव्हातरी व्हायला हवेच होते. कलम ३७० व्यतिरिक्त, हे सर्व आत्तापर्यंत पूर्ण व्हायला हवे होते. ३७० हे काम पूर्ण न होण्याचे कारण नव्हते. केंद्र सरकारने यापूर्वी यावर भर का दिला नाही? ३७० मध्ये (विकासाच्या कामात) कोणतीही अडचण नव्हती, समस्या ही होती की केंद्राने काश्मीरमध्ये पायाभूत प्रकल्पांवर जोर दिला नाही," असं ओमर अब्दुल्ला म्हणाले.

जम्मू-काश्मीरबाबत केंद्र सरकारने म्हटलं की दगडफेक, सुरक्षा या बाबींमध्ये सुधारणा झाल्या आहेत असं विचारले असता ओमर अब्दु्ल्ला म्हणाले, "बहुतेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प पाहिल्यास, ते त्या भागात नाहीत जेथे सामान्यतः निषेध दिसून आला. मग तो रेल्वे मार्ग असो, कटरा-बनिहाल, यापैकी एकही अशा भागात नाही जिथे आंदोलने झाली नव्हती."

सोनमर्ग बोगद्याच्या उद्घाटनाबाबतही ओमर अब्दुल्लांनी हा एक उत्तम प्रकल्प आहे, पण काही महिन्यांपूर्वी त्यावर अतिरेकी हल्ल्या झाला होता, असं म्हटलं. गेल्या वर्षी २० ऑक्टोबर रोजी गगनीरमधील सोनमर्ग बोगद्याच्या जागेवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता आणि त्यात सात लोक ठार झाले होते. मृतांमध्ये सहा मजूर आणि एक डॉक्टर यांचा समावेश होता.
 

Web Title: CM Omar Abdullah has said that the completion of infrastructure projects in JaK has nothing to do with the abrogation of Article 370

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.