"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 17:38 IST2025-09-30T17:36:28+5:302025-09-30T17:38:28+5:30
अर्थात त्यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या उत्तराखंड अधीनस्थ सेवा निवड आयोगाच्या परीक्षा प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यास सहमती दर्शवली आहे....

"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती
गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली एसआयटी करत आहे. समितीने काम सुरू केले आहे, मात्र तरुण अजूनही सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. यामुळे सरकार या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस करेल. यात कुठलीही अडचण येणार नाही. असे उत्तराखंडचे मुख्यंमत्री पुष्कर सिंह धामी यानी म्हटले आहे. अर्थात त्यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या उत्तराखंड अधीनस्थ सेवा निवड आयोगाच्या परीक्षा प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यास सहमती दर्शवली आहे. त्यांनी सोमवारी परेड ग्राउंडमध्ये आंदोलन करत असलेल्या तरुणांची भेट घेतली.
सोमवारी दुपारी अचानक परेड ग्राऊंडवर पोहोचलेल्या मुख्यमंत्र्यांनी आंदोलनस्थळी युवकांचे म्हणणे ऐकले. ते म्हणाले, “सणासुदीच्या काळात एवढ्या गरमीत आंदोलन करणाऱ्या युवकांना पाहून मलाही वाईट वाटत आहे. सरकारचा संकल्प आहे की, परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी असावी. गेल्या चार वर्षांत सरकारने याच दृष्टीने काम केले आहे." तरुणांना भावनिक आवाहन करत धामी म्हणाले, उत्तराखंडच्या युवकांना सरकारी नोकरीसाठी मेहनत करावी लागते आणि त्यांच्या स्वप्नांची त्यांना पूर्ण जाणीव आहे. स्वतः अशा परिस्थितीतून गेलेले असल्याने ते युवकांच्या भावना समजू शकतात.
धामी म्हणाले, आपण मुख्यमंत्री कार्यालयातही आंदोलन करणाऱ्या तरुमांची भेट घेऊ शकलो असतो. मात्र, तरुनांना काय कष्ट आहे, हे माहीत असल्याने थेट आंदोलनस्थळी येण्याचा निर्णय घेतला, गेल्या चार वर्षांत सरकारने 25 हजारांहून अधिक पारदर्शी भर्त्या केल्या असून, केवळ या एका प्रकरणात शंका निर्माण झाल्याने ती दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे." पुढे बोलताना धामी म्हणाले, गेल्या आठवड्यात जेव्हा तरुण आपल्याला भेटण्यासाठी आले होते, तेव्हाही आपण स्पष्ट केले होते की, तरुणांच्या मनात कुठल्याही प्रकारचा अविश्वास, शंका अथवा संशय निर्माण होऊ नये, अशी सरकारची इच्छा आहे. म्हणून, आपण कुणालाही न कळवता थेट परेड ग्राउंडवर आलो आहोत.
आंदोलनादरम्यान युवकांवर दाखल झालेले खटले मागे घेतले जातील, अशी घोषणाही त्यांनी केली. अमृतकाळात उत्तराखंडला देशातील सर्वोत्तम राज्य बनवण्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची असेल, असेही धामी यावेली म्हणाले.