“PM मोदी अन् नितीश कुमारांची जादू, बिहारमध्ये NDAचाच विजय होणार”; CM फडणवीसांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 16:30 IST2025-10-17T16:29:28+5:302025-10-17T16:30:31+5:30

CM Devendra Fadnavis Bihar Rally News: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहार येथील काही ठिकाणी भाजपाच्या प्रचारसभा, रोड शो यात सहभागी होत एनडीएचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

cm devendra fadnavis took part in bjp campaign for bihar assembly election 2025 and said pm narendra modi and nitish kumar magic continues and nda will win | “PM मोदी अन् नितीश कुमारांची जादू, बिहारमध्ये NDAचाच विजय होणार”; CM फडणवीसांना विश्वास

“PM मोदी अन् नितीश कुमारांची जादू, बिहारमध्ये NDAचाच विजय होणार”; CM फडणवीसांना विश्वास

CM Devendra Fadnavis Bihar Rally News: बिहारमधील जनता एनडीए सोबत आहे. पंतप्रधान मोदी यांचे बिहारवर आणि बिहारमधील लोकांचे पंतप्रधान मोदी यांच्यावर खूप प्रेम आहे. पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांची जादू संपूर्ण बिहारवर आहे. बिहारमधील एनडीएत सहभागी असलेले सर्व पक्ष आणि त्यांचे नेते एक चांगला विजय येथे साकारतील, असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही ठिकाणच्या प्रचारसभेत सहभाग घेतला. बिहारमधील विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे महाठकबंधन आहे. जनतेलाही लुटत आहेत आणि आपल्या मित्रपक्षांनाही फसवत आहेत. वरवर कितीही दाखवत असले, तरी विरोधक आतून एकत्र नाहीत. कारण हे सगळे जण सत्तेच्या लालसेचे धनी आहेत. त्यांना बिहार आणि येथील जनतेशी काही देणे-घेणे नाही. त्यांना केवळ सत्तेशी मतलब आहे. हे कधीही एकत्र येणार नाही आणि एकत्र लढणार नाहीत. यांचा दारूण पराभव होणार आहे. बेगूसराय येथेही जाऊन आलो आणि तिथे प्रत्येक ठिकाणी केवळ एनडीएचीच चर्चा आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बिहारमध्ये एनडीएचेच सरकार बनणार

बेगुसराय असो किंवा संपूर्ण बिहार असो, येथे एनडीएची जोरदार लाट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार पुन्हा एकदा एनडीएसोबत आहे. बिहारचे प्रेम पंतप्रधान मोदींवर काकणभर अधिक आहे. बिहारमध्ये सरकार एनडीएचेच स्थापन होणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. बेगुसराय विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कुंदन कुमार यांच्या प्रचारासाठी बिहारमधील बेगुसराय येथे भाजपचा रोड शो झाला. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटना साहिब विधानसभा भाजपाचे उमेदवार रत्नेश कुशवाहा यांच्या प्रचारार्थ 'नामांकन व आशिर्वाद सभा' यामध्ये सहभाग नोंदवला.  बिहार दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी पटना विमानतळावर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांची भेट घेतली.

 

Web Title : बिहार में मोदी-नीतीश का जादू, एनडीए की जीत: फडणवीस

Web Summary : फडणवीस ने बिहार में एनडीए की जीत का विश्वास जताया, मोदी-नीतीश की लोकप्रियता का हवाला दिया। उन्होंने विपक्ष की एकता की आलोचना की, राज्य में एनडीए की मजबूत लहर और मोदी के महत्वपूर्ण प्रभाव पर जोर दिया। एनडीए सरकार बनाएगी, उन्होंने कहा।

Web Title : Modi-Nitish magic ensures NDA victory in Bihar: Fadnavis

Web Summary : CM Fadnavis expressed confidence in NDA's Bihar victory, citing Modi-Nitish's popularity. He criticized opposition unity, emphasizing NDA's strong wave in the state and Modi's significant influence. NDA will form the government, he asserted.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.