शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

मुख्यमंत्र्यांना लखीमपूरला जाण्यास रोखलं, विमानतळावर जमिनीवर बसून नोंदवला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 14:55 IST

लखिमपूर खीरीला जाताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना लखनऊ विमानतळावर थांबवण्यात आलं.

लखनऊ: छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीकडे जात असताना पोलिसांना त्यांना विमानतळावरच अडवलं. लखीमपूर खीरी येथील पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी ते विमानाने लखनऊमध्ये दाखल झाले. पण, यूपी पोलिसांना त्यांना लखनऊ विमानतळातून बाहेर पडण्यापासून रोखले. त्यानंतर भूपेश बघेल विमानतळावरच जमिनीवर बसून सरकारचा निषेध केला.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे बाहेर पडण्यापासून रोखल्याची माहिती दिली. या संदर्भात त्यांनी सांगितले की मला कोणत्याही आदेशाशिवाय लखनऊ विमानतळाच्या बाहेर जाण्यापासून रोखले जात आहे. विमानतळात जमिनीवर बसलेल्या बघेल यांनी स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये ते जमिनीवर बसलेले दिसत असून, त्यांच्या अवतीभवती यूपी पोलिस दिसत आहेत.

प्रियंका गांधींना अटक, UP पोलिसांची कारवाईउत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये गेल्या 36 तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियंका गांधी यांनी कलम 144 चं उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी रोष व्यक्त केला आहे. प्रियंका गांधींना थोड्याच वेळात कोर्टासमोर हजर केलं जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस