मुख्यमंत्र्यांना लखीमपूरला जाण्यास रोखलं, विमानतळावर जमिनीवर बसून नोंदवला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 14:55 IST2021-10-05T14:49:41+5:302021-10-05T14:55:25+5:30
लखिमपूर खीरीला जाताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना लखनऊ विमानतळावर थांबवण्यात आलं.

मुख्यमंत्र्यांना लखीमपूरला जाण्यास रोखलं, विमानतळावर जमिनीवर बसून नोंदवला निषेध
लखनऊ: छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीकडे जात असताना पोलिसांना त्यांना विमानतळावरच अडवलं. लखीमपूर खीरी येथील पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी ते विमानाने लखनऊमध्ये दाखल झाले. पण, यूपी पोलिसांना त्यांना लखनऊ विमानतळातून बाहेर पडण्यापासून रोखले. त्यानंतर भूपेश बघेल विमानतळावरच जमिनीवर बसून सरकारचा निषेध केला.
बिना किसी आदेश के मुझे लखनऊ एयरपोर्ट से बाहर जाने से रोका जा रहा है। pic.twitter.com/4wwslm9bZr
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) October 5, 2021
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे बाहेर पडण्यापासून रोखल्याची माहिती दिली. या संदर्भात त्यांनी सांगितले की मला कोणत्याही आदेशाशिवाय लखनऊ विमानतळाच्या बाहेर जाण्यापासून रोखले जात आहे. विमानतळात जमिनीवर बसलेल्या बघेल यांनी स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये ते जमिनीवर बसलेले दिसत असून, त्यांच्या अवतीभवती यूपी पोलिस दिसत आहेत.
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) October 5, 2021
प्रियंका गांधींना अटक, UP पोलिसांची कारवाई
उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये गेल्या 36 तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियंका गांधी यांनी कलम 144 चं उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी रोष व्यक्त केला आहे. प्रियंका गांधींना थोड्याच वेळात कोर्टासमोर हजर केलं जाण्याची शक्यता आहे.